• Fri. Mar 6th, 2026
    पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवरील मुंबई मार्गिका ७ तास बंद राहणार, पर्यायी मार्ग जाणून घ्या

    मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. तर्फे पनवेल-कर्जत दुहेरी मार्ग उपनगरीय रेल्वे कॉरिडोरचे काम किमी ०७.५६० (चिखले ब्रिज) येथे दिनांक ९ नोव्हेंबर म्हणजेच उद्या सकाळी साडे दहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत करण्यात येणार आहे.

    मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. तर्फे करण्यात येणाऱ्या वरील नियोजित कामाचे वेळी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मुंबई वाहिनीवर सर्व प्रकारची वाहने (हलकी व जड अवजड वाहने) यांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
    मनोज जरांगेंचा एकेरी उल्लेख, ओबीसीतील जातींना बाहेर ढकलून स्पेस बळकावण्याचा डाव; छगन भुजबळांचा आरोप

    पर्यायी मार्ग कोणते ?

    १. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे येणारी वाहने मुंबई लेन कि.मी. ९.६०० पनवेल एक्झिट वरून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावर करंजाडे मार्गे कळंबोली अशी वळविण्यात येतील.

    २. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे येणारी वाहने शेडुंग फाट्यावरून बोर्ले टोल नाक्याकडे न येता सरळ पनवेलच्या दिशेने मार्गस्थ करण्यात येतील.

    ३. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरून पुणे बाजू कडून मुंबई बाजूकडे येणारी हलकी वाहने कि.मी. ३९.८०० खोपोली एक्झिट वरून वळवून मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ या मार्गावरून मार्गस्थ करण्यात येतील.
    वर्ल्ड नंबर १! अखेरीस शुभमन गिलने बाबर आझमला धक्का दिलाच, ICC रँकिंगमध्ये भारताचा दबदबा

    यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर गँट्री बसवण्याचा कामानिमित्त गेल्या काही दिवसांपासून विशेष ब्लॉक घेतले जात होते. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मुंबई आणि पुणे मार्गिकांवर आज देखील वेगवेगळ्या वेळेत अर्ध्या तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता.

    दरम्यान, प्रवासासाठी बाहेर पडल्यानंतर वाहतूक बंद असल्यानं मनस्ताप होऊ नये यासाठी वाहनधारकांनी मुंबई पुणे महामार्गावरील वाहतुकीतील बदलांबद्दल माहिती घेतल्यानंतर घराबाहेर पडणं आवश्यक आहे. दिवाळी असल्यानं गावी जाणाऱ्यांची संख्या देखील मोठी असल्यानं वाहनधारकांनी प्रशासनानं वाहतुकीबाबत केलेले बदल लक्षात घेऊन प्रवासाचं नियोजन केल्यास त्यांना मनस्ताप होणार नाही.
    OBC आरक्षणाबाबत मुंबई हायकोर्टात काय घडलं? राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश, पुढील सुनावणी कधी?

    दिवाळी खरेदीसाठी पुण्यात बाजारपेठांमध्ये गर्दी, लक्ष्मी रस्ता वाहतुकीस बंद

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed