• Sat. Sep 21st, 2024

तू इथे का थांबला? क्षुल्लक कारणावरुन मावळमधील टोळक्याने तरुणाला छातीत सुरा भोसकून संपवलं

तू इथे का थांबला? क्षुल्लक कारणावरुन मावळमधील टोळक्याने तरुणाला छातीत सुरा भोसकून संपवलं

मावळ, पुणे : मावळ तालुक्यातील जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्रीच्या अंधारात तरुण रस्त्याच्या कडेला थांबला असताना ” तू इथे का थांबला, अशी विचारणा करत चार जणांच्या टोळक्याने त्या तरुणाला बेदम मारहाण केली. ते चौघे फक्त मारहाण करूनच थांबले नाहीत तर त्यांनी त्या तरुणाच्या छातीत चाकू भोसकून त्याचा खूनही केला. त्यानंतर ते चौघे घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेने संपूर्ण मावळ तालुका हादरला आहे.

कृष्णा शेळके असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्यासोबत त्याचे मित्र देखील होते. या प्रकरणी तळेगाव पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर तळेगाव परिसरात कृष्णा आणि त्याचे दोन मित्र रस्त्याच्या कडेला थांबले होते. त्यावेळी चार आरोपी त्या ठिकाणी आले आणि त्यांना दमदाटी करत ‘तू इथे का थांबला?’ अशी विचारणा करू लागले. त्यावेळी कृष्णा आणि त्याच्या मित्रांचा या चार आरोपींसोबत वाद झाला. त्यात या चार आरोपींनी कृष्णा याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्या छातीत चाकू भोसकून त्याचा खून केला.

या घटनेने घटनास्थळावरून आरोपी पसार झाले आहेत. या घटनेने महामार्गावर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाला होता. पुणे आणि जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना पहायला मिळत आहे. त्यातच रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तळेगाव पोलिस करत आहेत.

सध्या पुण्यात क्षुल्लक कारणावरुन होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. रोज नवे गुन्हे समोर येत आहेत. क्षुल्लक कारणावरुन भांडणं होतात, त्याच्या रागातून खून आणि हत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आता पोलीस गुन्हेगारी घटनांना पायबंद घालण्यासाठी काय करणार, याकडे नागरिकांचे डोळे लागले आहेत.

वयाच्या १० व्या वर्षी चार्जर चोरलं, तिथून सुरुवात; थेट मूसेवालाच्या हत्येवरच शेवट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed