गजानन पाटील, हिंगोली : दिवाळी म्हटलं की फटाक्याची आतिशबाजी आणि फराळांची रेलचेल प्रत्येकांच्या घरामध्ये सुरू असते. मात्र, काही घटनांमुळे या आनंदाच्या क्षणावर कधी दुःखाचं विरजण पडेल याचा काहीच नेम सांगता येत नाही. असाच प्रकार आज ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हिंगोली शहरातील नाईक नगर भागातील संदेश मुकीलवार यांच्या मालकीच्या घरामध्ये दिवाळीचा फराळाचे साहित्य बनवताना भयानक घटना घडली आहे.
शेगडीपासून अचानक गॅसची नळी निसटली आणि तिने पेट घेतला. आग वाढत जाऊन फ्रीजमधील कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. फ्रिजमधील कॉम्प्रेसरचा स्फोट एवढा भयानक होता की. यामुळे सर्वत्र आगिने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे घरातील साहित्य आणि जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळताच हिंगोली नगरपरिषदेचे अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर साहित्याचे नुकसान झालं आहे. मात्र, आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये अग्निशमन दलाला यश आलं आहे. तर या घटनेत परिवारातील फराळाचे साहित्य बनवत असताना या लागलेल्या आगीत घरातील एक महिला गंभीर भाजली असून त्या महिलेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अजूनही या ठिकाणी धुराचा लोट निघत असून घरातील नागरिक भयभीत झाले आहेत. तर परिसरामधील नागरिक देखील या घटनेमुळे चांगलेच धास्तावले आहेत.