• Mon. Nov 25th, 2024
    भरधाव ट्रकची महिला API अधिकाऱ्याच्या बाईकला धडक, भीषण अपघातात पाय धडावेगळा

    अमरावती : चहुबाजूने विकसित होत असलेल्या अमरावती शहरातील मुख्य व वर्दळीच्या चौकांमध्ये बेशिस्त वाहतुकीमुळे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सकाळच्या सुमारास गणवेश धारण करून कर्तव्यावर निघालेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या दुचाकीला भरधाव येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात महिला पोलीस अधिकाऱ्याचा पायच धडावेगळा झाला. हा थरारक अपघात आज अमरावती शहरातील बियाणी चौकात घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, बेशिस्त वाहतुकीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

    अमरावती शहरातील बियाणी चौकात आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास राजापेठ पोलीस पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका कोठेवार या गणवेश धारण करून अॅक्टिवा क्रमांक MH 27 BN 4714 कर्तव्यावर जात होत्या.

    धोनी माझा जवळचा मित्र नाही; असं का बोलून गेला युवराज सिंग? सांगितल्या २ मोठ्या घटना
    कोठेवार या तपोवनकडून बियाणी चौकमार्गे राजापेठ येथे जात होत्या. दरम्यान, भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांना जबर धडक दिली. सकाळच्या सुमारास वर्दळीच्या या चौकात ट्रकने दिलेली धडक एवढी जबर होती की, यामध्ये महिला पोलीस अधिकारी कोठेवार यांचा पाय क्षणात धडावेगळा झाला. संपूर्ण गणवेशात असलेली महिला अधिकारी पूर्णता: रक्ताने माखल्या होत्या.

    यावेळी रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांनी त्यांना तात्काळ एका ऑटोमध्ये टाकून परिसरातीलच लाहोटी रुग्णालयात दाखल केलं. ट्रकने दिलेली धडक एवढी जबर होती की यामध्ये महिला अधिकाऱ्याच्या पायापासून डाव्या पायाचा पंजा पूर्णता: धडावेगळा झाला. डॉक्टरांनी त्यांना तात्काळ ऑपरेशन थेटरमध्ये घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू केले.
    यावेळी अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्रावर रेड्डी आणि पोलीस उपायुक्त यांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित ट्रक आणि ट्रक चालकाला पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

    याबाबत “महाराष्ट्र टाइम्स” सोबत बोलताना अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्रावर रेड्डी म्हणाले की, सकाळच्या सुमारास महिला अधिकाऱ्यांच्या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर आम्ही घटनास्थळी गाव घेतली. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी ट्रिपल सीट व भरधाव वाहनावर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी सुद्धा वाहतूक नियमाचे पालन करून सहकार्य केल्यास कोणाच्या जिवाला जीवितहानी निर्माण होणार नाही.
    होऊ दे खर्च, कंपनीकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून अनोखी भेट, महागड्या दुचाकी अन् बरंच काही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed