Chandrapur Two Female Police Transferred: चंद्रपूर शहरातील कस्तुरबा चौक मधील सिग्नल वेळेवर सुरू करण्याची जबाबदारी दोन महिला कर्मचाऱ्यांवर होती. या दोन्ही महिला पाच मिनिट उशिरा पोहोचल्या.
हायलाइट्स:
- सिग्नल सुरु करायला पाच मिनिट उशीर
- जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केली दोन महिला पोलिसांची बदली
- चंद्रपूरमधील धक्कादायक प्रकार
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीत रस्सीखेच; तीनही घटकपक्षांचा दावा, वरिष्ठांकडे पदासाठी लॉबिंग
‘या’ समस्या कडेही लक्ष द्या…
चंद्रपूर शहरातील वाहतूक शाखेचा कार्यालयापुढे खासगी बसेसच्या भल्यामोठ्या रांगा उभ्या असतात. यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या वाहनाकडे जाणीवपणे दुर्लक्षित केले जाते. दिव्याखाली अंधार असा हा प्रकार आहे. वाहतूक पोलीस अधीक्षकांनी डोळे बंद केले असले तरी शिस्त पाळणारे जिल्हा पोलीस अधिक्षक यावर कार्यवाही करतील काय? अशी चर्चा आता शहरात सुरू आहे. आता त्या अधिक्षकांबाबत काय निर्णय घेतला जातो ते बघणं महत्त्वाचं असेल.
उशीर झाला तर कार्यवाही, मारहाण झाली तर शांत…
काही महिन्यांपूर्वी जटपुरा गेट परिसरात महिला पोलीस कर्तव्यावर असताना महिला पोलिसावर एका राजकीय पक्षातील पदाधिकारी महिलेने मारहाण केली होती, असा धक्कादायक प्रकार घडला होता. एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झालेली असताना जिल्हा पोलीस अधिक्षकांनी या गंभीर प्रकाराची दखल घेतली नसल्याची चर्चा पोलीस विभागातून पुढे आली होती.