• Sat. Sep 21st, 2024
Raigad Blast : MIDC मधील कंपनीत सलग ८ ते १० स्फोट, चार जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता; रायगडमधील घटना

रायगड : रायगड जिल्ह्यात महाड एमआयडीसी येथे ब्ल्यू जेट हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीत आज सकाळी लागोपाठ स्फोट झाला. या स्फोटात आग लागल्याने तब्बल ११ कामगार बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. साडेदहा वाजता पहिला स्फोट झाला. त्यानंतर आठ ते दहा स्फोट झाल्याने महाड एमआयडीसी हादरली आहे. हा स्फोट झाला त्यावेळी ५७ कर्मचारी या कंपनीत होते. यामधील तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर जखमींवर महाड येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

नागोरे येथून रिलायन्स कंपनीचे तज्ञांच्या पथकाचं पाचारण करण्यात आलं आहे. हे पथक आल्यानंतर कंपनीत प्रवेश करून बेपत्ता कामगारांचा शोध तातडीने घेतला जाणार आहे, अशी माहिती रायगड जिल्ह्यातील महाड तालुका प्रशासनाकडून देण्यात आली. प्रांताधिकारी ज्ञानेश्वर बनापुरे, पोलीस प्रशासन, नगरपरिषद प्रशासन आदी घटनास्थळी दाखल झाले आहेत. बेपत्ता कामगारांचा शोध सुरू आहे. आग नियंत्रणात असली तरी जिल्ह्यातील अनेक अग्निशमन यंत्रणा, पाण्याचे टँकर घटनास्थळी उपस्थित आहेत.

दरम्यान, या घटनेत तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असला तरीही प्रशासनाकडून अद्याप कोणाचाही मृत्यू झाल्याच्या घटनेला दुजोरा देण्यात आलेला नाही.
मराठा आरक्षणासाठी जाळपोळ आणि हिंसक आंदोलन, गुणरत्न सदावर्ते सरसावले, जरांगेविरुद्ध कारवाईसाठी हायकोर्टात याचिका
स्फोटानंतर प्लांटमध्ये लागली आग लागली आहे. यानंतर अग्नीशमन यंत्रणा, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन वाहनांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. यापूर्वीही गेल्याच महिन्यात पाच ऑक्टोबर रोजी महाड एमआयडीसी मधील प्रसोल कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात वायू गळती झाली होती. त्यावेळी एकाचा मृत्यू झाला होता. तर नाइट शिफ्टला असलेले ५ कामगार या विषारी वायूमुळे जागीच बेशुद्ध पडले होते.

मोहम्मद शमी इतका धोकादायक गोलंदाज कसा झाला? लंकादहन झाल्यानंतर स्वतः सांगितले- कोणतेही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed