• Mon. Nov 25th, 2024

    तूर कापसाच्या शेतीत भलत्याच पिकाची लागवड, LCB ला टीप मिळताच पोलीस शेतात पोहोचले अन्..

    तूर कापसाच्या शेतीत भलत्याच पिकाची लागवड, LCB ला टीप मिळताच पोलीस शेतात पोहोचले अन्..

    धुळे : राज्यात गांजा शेतीवर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र, काही शेतकऱ्याकंडून गांजाच्या रोपांची लागवड करण्यात येत असल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. पोलिसांकडून अशा शेतकऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येते. धुळे जिल्ह्यात देखील अशाच प्रकारची कारवाई पोलिसांनी केली आहे. शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान गावातील एका शेतात स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल तीन कोटी रुपयांच्या किमतीचं गांजाचं पीक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिसांनी ही माहिती समजताच सदर शेतावर छापा मारुन सदर गांजा जप्त केला आहे. ज्या शेतात गांजा लागवड करण्यात आली होती तो शेतमालक फरार झाला आहे.

    शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान येथे देवा कहारु पावरा या शेतकऱ्याने त्याच्या शेतात गुंगीकारक औषधे तसेच मनोव्यापारावर परिणाम करणारे गांजा पिकाची शेतात लागवड केल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाल्याच्या आधारे ही कारवाई केली आहे.
    बेडेकर लोणची-मसाले फेम अतुल बेडेकर यांचं निधन, वयाच्या ५६ व्या वर्षी अखेरचा श्वास
    धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सदर शेतावर छापा टाकला असता त्यांना गांजा झाडांचे तीस किलो वजनाचे १९९ गठ्ठे व ३२ किलो वजनाचा एकूण ३ कोटी १० हजार रुपयांचा गांजा आढळून आला. सदर गांजा पोलिसांनी जप्त केला असून वरील शेतकऱ्याविरुद्ध एलसीबीचे पो. कॉ. महेंद्र सपकाळ यांनी शिरपूर पोलिसात तक्रार दिली असून पुढील तपास पीएसआय संदीप पाटील करीत आहेत. या घटनेतील आरोपी फरार झाला आहे.
    मोहम्मद शमी इतका धोकादायक गोलंदाज कसा झाला? लंकादहन झाल्यानंतर स्वतः सांगितले- कोणतेही…
    शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान परिसरात सर्रासपणे कापूस तूर अशा विविध प्रकारच्या पिकांच्या अडून मोठ्या प्रमाणात गांजाची शेती करण्यात येत असते. मात्र पोलीस देखील अनेकदा कारवाई करतात मात्र, गुप्तता पाळून काही शेतकरी लागवड करत असल्याचं चित्र आहे. शिरपूर तालुका त्यातील लाकड्या हनुमान परिसर म्हणजे गांजाच्या शेतीसाठी बालेकिल्ला असल्याचे मानले जाते. सध्या पोलिसांनी या परिसरात खडक पहारा देत अनेकदा मोठ्या कारवाया या परिसरात केल्या आहेत. आता नुकताच तब्बल तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पकडला आहे. दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने ही मोठी कामगिरी केल्याने पोलीस अधीक्षकांनी संबंधित पोलीस पथकाला तब्बल वीस हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

    मराठा आरक्षणासाठी जाळपोळ आणि हिंसक आंदोलन, गुणरत्न सदावर्ते सरसावले, जरांगेविरुद्ध कारवाईसाठी हायकोर्टात याचिका

    ललित पाटीलच्या चालकाने नदीत फेकलेले ड्रग्ज शोधण्याच्या नादात २० कोटी लिटर पाणी वाया, स्थानिकांचा आरोप!

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed