परंपरा काय?
– युनेस्कोतर्फे दरवर्षी ३१ ऑक्टोबरला जगभरातील सर्जनशील शहरांची (क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क) घोषणा.
– यासाठी हस्तकला व लोककला, रचनात्मक कला, चित्रपट, साहित्य, माध्यमकला, संगीत आणि पाककला या सात श्रेणींचा समावेश.
– यंदाच्या सूचीत ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) व कोझिकोड (केरळ) या शहरांना स्थान.
– ग्वाल्हेरला लाभलेल्या समृद्ध सांगीतिक वारशाची तर, कोझिकोडला लाभलेल्या साहित्यिक वारशाची युनेस्कोकडून दखल.
– या दोन्ही शहरांनी आपापल्या या वारशांचे प्रभावीपणे संवर्धन केल्याचे युनेस्कोचे गौरवोद्गार.
– बुखारा (उजबेकिस्तान), कॅसाब्लांका (मोरोक्को), चूंगचींग (चीन), काठमांडू (नेपाळ), रिओ द जेनेरो (ब्राझील), उलनबातोर (मंगोलिया) या शहरांचाही समावेश.
– यंदाच्या ५५ नव्या शहरांमुळे क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमधील शहरांची संख्या साडेतीनशे.
– पोर्तुगाल येथे १ ते ५ जुलै २०२४ येथे होणाऱ्या युनेस्कोच्या वार्षिक परिषदेत उपस्थित राहण्यासाठी या शहरांच्या प्रतिनिधींना आमंत्रण.
पंतप्रधान म्हणाले…
– भारतासाठी हा अतिशय़ अभिमानाचा क्षण.
– यामुळे आपल्या देशाची सांस्कृतिक परंपरा जागतिक स्तरावर नव्याने चमकली.
– आपल्या सर्वांच्या सामूहिक योगदानामुळेच ही उपलब्धी.
– आपल्या देशाच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेचे संवर्धन करणे व त्यास प्रोत्साहन देण्याच्या कामी आपण कटिबद्ध.