• Sat. Sep 21st, 2024
Mumbai Local: लोकलचा विशेष ब्लॉक पथ्यावर, प्रवाशांची मेट्रोला पसंती, कोट्यवधींचा प्रवास

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्या रद्द केल्यामुळे प्रवाशांनी मेट्रोने प्रवास करणे पसंत केले आहे. त्यामुळे ‘एमएमआरडीए’कडून सुरू असलेल्या मेट्रो २ अ व मेट्रो ७ या मार्गिकांवरील प्रवाशांचा आकडा वाढला. या संयुक्त मेट्रो मार्गिकेने दैनंदिन प्रवासीसंख्येचा अडीच लाखांचा आकडा गाठला आहे.

पश्चिम उपनगरीय रेल्वेवरील खार रोड ते गोरेगावदरम्यानच्या कामासाठी २७ ऑक्टोबरपासून ५ नोव्हेंबरपर्यंत विशेष मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे अनेक लोकलफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे लोकलसेवेचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मेट्रोचा पर्याय स्वीकारला आहे.

मोठी बातमी, मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे, मराठा आरक्षणासाठी सरकारला नवी डेडलाइन, साखळी उपोषण सुरु राहणार
मेट्रोच्या मेट्रो २ अ-अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व आणि मेट्रो ७ -गुंदवली ते दहिसर या दोन्ही मार्गिकांवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स लिमिटेडकडून (एमएमएमओसीडब्ल्यू) चालविल्या जातात. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी या संयुक्त मार्गिकांवर २,५०००४ प्रवाशांनी प्रवास केला. याआधी नवरात्रीदरम्यान ही संख्या २ लाख ४३ हजार इतकी होती. तर अंधेरी पश्चिम व गुंदवली स्थानकांवरील प्रवासीसंख्येने उच्चांक गाठला आहे.

कोट्यवधींचा प्रवास

-मेट्रो २ अ मार्गिका ही डीएननगर जवळील अंधेरी पश्चिम ते दहिसर पूर्व अशी आहे. तर मेट्रो ७ ही अंधेरी पूर्वेकडील गुंदवली ते दहिसर दरम्यान आहे.

-या संयुक्त मार्गिकेचा पहिला टप्पा २ एप्रिल, २०२२ आणि दुसरा व अंतिम टप्पा २० जानेवारी, २०२३ रोजी सुरू झाला.

-या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रोसेवा संयुक्त असून त्या पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या दहिसर ते अंधेरी स्थानकांच्या पूर्व व पश्चिम दिशेने धावतात.

-आतापर्यंतची प्रवासीसंख्या आता ५.८० कोटींच्यावर गेली आहे. ही संख्या एप्रिलमध्ये २ कोटी व सप्टेंबरमध्ये ५ कोटींवर पोहोचली होती.

‘सध्या मुबलक जागा’

लोकलसेवा रद्द असल्याने मेट्रोवरील गर्दी वाढती आहे. कार्यालयीन कालावधीत स्थानकात प्रवेश घेण्यासाठी प्रवाशांच्या मोठमोठ्या रांगा या मार्गिकेवरील प्रमुख स्थानकांत असल्याचे ‘एमएमएमओसीडब्ल्यूच्या’च ट्विटवरून स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे फेऱ्या वाढविण्याची मागणी होत आहे. ‘सध्या आम्ही स्थितीचा अभ्यास करीत आहोत. गरज भासल्यास फेऱ्या वाढवू. परंतु सध्या डब्यांमध्ये मुबलक जागा आहे’, असे कंपनीचे म्हणणे आहे.

शुभमनने पाकिस्तानच्या बाबर आझमचा विक्रम मागे टाकला, शतक हुकले तरी वनडे क्रिकेटमधील खास यादीत पोहोचला अव्वल स्थानी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed