• Sat. Sep 21st, 2024
सख्ख्या भावांच्या दाखल्यांवर जातीची नोंद वेगळी; एकाची कुणबी तर दुसऱ्याची मराठा, शिंदे समितीवर प्रश्नचिन्ह

पुणे: मराठा आरक्षणावरून राज्य पेटलेले असताना राज्य सरकारकडून आज मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी कुणबी प्रमाणपत्र वाटण्याबाबत आदेश दिले आहेत. मात्र, या कुणबींमध्ये देखील अनेक गोंधळ असल्याचे समोर आलं आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे गावात दोन सख्ख्या भावांच्या दाखल्यांवर एकावर कुणबी आणि आणि एकावर हिंदू मराठा अशी नोंद आढळली आहे. त्यामुळे शिंदे समितीने तयार केलेला अहवाल कितपत योग्य आहे? हे यावरून दिसून येतं आहे.
डुक्करांनी भरलेला ट्रक थेट नगरपरिषदेत; ग्रामस्थ कुटुंबासह मुख्यालयाच्या गेटवर धडकले, कारण काय?
आंबेगाव तालुक्यातील फक्त एका गावातच ११२० नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळे अशा अनेक गावांच्या नोंदी समोर येणे बाकी आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन कोटी कुणबी संदर्भात नोंदी तपासले असता १३ हजार ४९८ जुन्या कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत, असं शिंदे समितीच्या अहवालामध्ये म्हटलं आहे. मात्र, ही आकडेवारी मराठवाड्यातली असल्याची समोर आली आहे. जना कृष्णाजी आंबटकर – कुणबी, सुदाम कृष्णाजी आंबटकर – हिंदू मराठा (रा. म्हाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव, जि. पुणे) अशी नोंद त्यांच्या दाखल्यावर आहे.

लेकाच्या मागे बाप खंबीर, मनोज जरांगेंच्या वडिलांनी मुलाला बळ दिलं

राज्यातही हाच पेच निर्माण झाला आहे. काहींच्या नोंदी कुणबी तर नंतर त्यातील काही नोंदी मराठा म्हणून ओढल्या गेल्या. सरकारला फक्त धोरणात्मक निर्णय मराठ्यांना आरक्षण द्यायचे आहे. तेवढ्यासाठी किती आढेवेढे घेणार? असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कुणबी प्रमाणपत्राचे वाटप झाल्यानंतर अनेक ठिकाणी तरुणांनी ते जाळून देखील टाकले आहे. मात्र, आंबेगाव तालुक्यातील दोन भावंडांची प्रमाणपत्र व्हायरल झाल्याने पुन्हा कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed