• Mon. Nov 25th, 2024
    मराठा आरक्षणासाठी सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न; दहा जण झाडावर चढले, फास लावून घेण्याआधीच…

    अहमदनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठिकठिकाणी तरुणांच्या आत्महत्या सुरू आहेत. पाथर्डीत मात्र एकाच वेळी दहा जण गळफास लावून घेण्यासाठी झाडावर चढले होते. ते फास लावून घेणार तेवढ्यात नागरिक आणि पोलिसांनी तेथे धाव घेतली. त्यांना समजूत काढून खाली उतरविण्यात आले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर या कार्यकर्त्यांचा रोष होता. त्यामुळे खाली उतरताना त्यांना राणे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. सामूहिक आत्महत्यांचा प्रकार घोषणाबाजीवर थांबला.
    सख्ख्या भावांच्या दाखल्यांवर जातीची नोंद वेगळी; एकाची कुणबी तर दुसऱ्याची मराठा, शिंदे समितीवर प्रश्नचिन्ह
    मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे येथे ही घटना घडली. मराठा समाज आणि मनोज जरांगे यांच्यावर टीका करणारे मंत्री राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा. मराठा आंदोलकांवर ठिकठिकाणी दाखल गुन्हे रद्द करावेत. मनोज जरांगे पाटील यांच्या जीविताला धोका असून त्यांनी मराठा आरक्षणाविषयी केलेल्या मागण्या तत्काळ पूर्ण करून त्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी या तरूणांची होती. या मागणीसाठी आदिनाथ देवढे, संजय देवढे, प्रकाश काटे, सचिन काटे, गणेश देवढे, नामदेव देवढे, युवराज यादव, योगेश देवढे, सचिन देवढे, अनंता देवढे या दहा तरुणांनी सामूहिकपणे गळफास घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी आंदोलनस्थळी असलेले झाडावर गळफास घेऊन चढले.

    मराठा समाजातील लेकरांचे मुडदे पडायला लागले, सरकार लक्ष देईना; जरांगेंची टीका

    हा प्रकार गावातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी गामस्थांना माहिती देत पोलिसांनाही कळविले. पाथर्डी पोलीस आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सकल मराठा समाजाच्या या तरुणांची समजूत घातली. बराच काळानंतर त्यांची समजूत काढण्यात यश आले. त्यावेळी नारायण राणे, रामदास कदम, गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांनी आंदोलकांचे प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार श्याम वाडकर यांच्याशी बोलणे करून दिले. कार्यवाहीचे आश्वासनानंतर आंदोलक झाडावरून खाली उतरले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed