• Mon. Nov 25th, 2024

    पुण्यात सव्वाबारा हजार जणांना कुणबी प्रमाणपत्र, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची माहिती

    पुण्यात सव्वाबारा हजार जणांना कुणबी प्रमाणपत्र, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची माहिती

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी राज्यभर वातावरण तापले असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी प्रमाणपत्राचे वाटप करावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना जारी केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर एक जानेवारी २०२२ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत (मंगळवार) एकट्या पुणे जिल्ह्यात सुमारे सव्वाबारा हजार जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मंगळवारी दिली. प्रमाणपत्र देताना १९६७ पूर्वीचे महसुली पुरावे तपासण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी मनोज जरांगे -पाटील यांनी उपोषण सुरु केले आहे. त्यावरून राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांच्या उपोषणाला सकल समाजातून पाठिंबा मिळत आहे. गावोगावातून उषोषणाला नागरीक बसले आहेत. त्यावरून अनेक जिल्ह्यांतून कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश जारी केले आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या संदर्भात सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. त्यांनीही असे आदेश दिले आहेत.
    वर्ल्ड कप सुरु असतानाच BCCI ने घातली भारतीय खेळाडूवर दोन वर्षांची बंदी, पाहा नेमकं काय घडलं…

    आतापर्यंत तेरा हजार अर्ज

    राज्यात कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असले तरी पुणे जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही यापूर्वीच करण्यात आली होती. एक जानेवारी २०२२ ते ३१ ऑक्टोबर या काळात सुमारे १२ हजार ९११ एवढे अर्ज आले होते. महसुली पुरावे तपासून त्यातील १२ हजार २९४ जणांना आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. एकूण अर्जाच्या तुलनेत प्रमाणपत्र वाटपाचे प्रमाण ९६ टक्के आहे. यातील ४६० अर्ज प्रलंबित असून अर्जदारांनी वंशावळ पुरावे सादर केल्यानंतर कार्यवाही करावी, असे आदेश संबंधित प्रांताधिकारी तसेच तहसिलदार यांना दिले आहेत, असे जिल्हाधिकारी देशमुख यांनी स्पष्ट केले. एकूण अर्जापैकी १५७ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. एकूण अर्जांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ एक टक्का इतकेच आहे.

    पुणे जिल्ह्यात कुणबी प्रमाण प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया कायम सुरूच आहे. योग्य पडताळणीनंतर प्रांताधिकारी तसेच तहसीलदार या संदर्भात निर्णय घेत आहेत.

    – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी

    भाषांतरकारांची मदत

    महसुली पुराव्यात बहुतांश पुरावे हे मोडी लिपीत असल्याचे आढळले आहे. त्यात पुराव्यांचे भाषांतर करणे गरजेचे होते. पुराभिलेख संचालनालयाने मोडी लिपीचे प्रशिक्षण दिलेल्यांना आणि ते उत्तीर्ण झालेल्यांचे प्रमाणपत्र असलेल्यांना भाषांतरासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार मोडी लिपीतील हे पुरावे भाषांतरीत करण्यासाठी अशा उत्तीर्णांची मदत घेण्यात आली.
    पाकिस्तानच्या विजयाने वर्ल्ड कपमध्ये मोठा उलटफेर, एका संघाचे पॅकअप तर दोघांना धक्का…
    – कुणबी प्रमाणपत्र देताना १९६७ पूर्वीचे महसुली पुरावे ग्राह्य. त्याची पडताळणी होणार.
    – गाव नमुना क्रमांक १४ मध्ये जन्म मृत्यूची नोंद आढळून येते.
    – एखाद्याचा जन्म किंवा मृत्यू कुणबी म्हणून नोंद असेल तर त्यांनाच प्रमाणपत्र
    – शाळा सोडल्याचा दाखला, कडई पत्रक तसेच जुन्या फेरफारमधील नोंदीत एका कुणब्याने दुसऱ्या कुणब्याला जमीन विक्री केल्याचा उल्लेख असल्यास प्रमाणपत्र
    – सातबारा उताऱ्यात उतरंडीनुसार कुणबी वंशावळ लागले असल्यासही प्रमाणपत्र
    एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची खूप सवय, भाजप संपायला लागली, अनेक राज्यांत पक्ष रिव्हर्स आला : मनोज जरांगे
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *