• Mon. Nov 25th, 2024
    अखेर ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात; बुधवारी न्यायालयात करणार हजर

    पुणे: ससून ड्रग्ज प्रकरणात ‘मोस्ट वॉन्टेड’ असलेल्या आरोपी ललित पाटीलचा ताबा अखेर पुणे पोलिसांना मिळाला आहे. पुणे पोलिसांनी अंधेरीच्या न्यायालयात दाखल केलेले प्रोड्यूस वॉरंट मान्य करण्यात आले होते. मंगळवारी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथके त्याला आणण्याकरिता मुंबईला रवाना झाली होती. दुपारी त्याचा ताबा पोलिसांकडे देण्यात आला. त्यानंतर गुन्हे शाखेची पथके त्याला घेऊन पुण्याकडे रवाना झाली. त्याच्याकडे आता दोन गुन्ह्यांच्या अनुषंगाने तपास केला जाणार आहे.
    आमच्या जरांगे दादाची काळजी घ्या; तरुणानं चिठ्ठीत लिहिलं, अन् आरक्षणासाठी जीवनयात्रा संपवली
    रात्री उशिरा गुन्हे शाखेची पथके त्याला घेऊन पुण्यात दाखल झाली आहेत. ललितसोबत शिवाजी शिंदे आणि रोहित चौधरी यांचाही ताबा पुणे पोलिसांना मिळाला आहे. या सर्वांना बुधवारी पुणे न्यायालयात हजर केले जाणार आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ससून रुग्णालयातून चालविण्यात येणारे अमली पदार्थ तस्करी रॅकेट उद्धवस्त केले. या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला ललित पाटीलसह तिघांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, पाटीलला अटक करण्यापूर्वीच तो ससून रुग्णालयातून पळून गेला होता. त्याला मुंबई पोलिसांनी बेंगळुरू-चेन्नई पट्ट्यातून अटक केली.

    उपोषणाचा सातवा दिवस, जरांगेंच्या उपोषणस्थळी रविकांत तुपकरांची भेट

    पाटीलसह शिंदे आणि पंडित हे तिघेही मुंबर्इच्या साकीनाका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकेत होते. शिंदे हा ललितच्या कारखान्यासाठी ‘मेफेड्रॉन’ तयार करण्याचा कच्चा माल पुरवत होता. राहुल प्रत्यक्ष ‘मेफेड्रॉन’ तयार करत होता. गोलू ऊर्फ रेहान अन्सारी हा मालाची विक्री करीत होता. पुणे पोलिसांनी गोलूला यापूर्वीच अटक केली आहे. माझ्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका आहे. त्यांनी मला मारहाण केली होती. त्यामुळे बरगडी आणि कानामध्ये जखम झाली होती, असा गंभीर आरोप ललितने पोलिसांवर केला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ललितला ताब्यात घेतले असून त्याच्या चौकशीत अमली पदार्थ तस्कर, येरवडा कारागृह, ससून रुग्णालय आणि पोलीस आणि राजकारणी यांच्याबाबत काय माहिती समोर येणार, याबाबत तर्क लढवले जात आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *