• Mon. Nov 25th, 2024
    भावंड आईसोबत नदीवर गेले; लहान मुलगा अचानक पाण्यात पडला, वाचवण्यासाठी दोघांची उडी, मात्र…

    नाशिक: जिल्ह्यात असलेल्या येवला तालुक्यातील उंदीरवाडी या गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. नदीच्या पाण्यात बुडून दोन सख्ख्या भावंडांचा आईच्या डोळ्यासमोरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आई थोडक्यात बचावली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आई आणि आपले दोन मुले नदीकाठी कपडे धुण्यासाठी गेले असताना ही दुर्देवी घटना घडली आहे.
    धक्कादायक…! रागात पत्नीवर हल्ला; आईने पाहताच पोटात चाकू सोडून पती फरार, नेमकं काय घडलं?
    मिळालेल्या माहितीनुसार, येवला तालुक्यातील उंदीरवाडी येथील भाऊसाहेब जाधव यांच्या पत्नी अनिता जाधव या आपल्या दोन मुलांसह कपडे धुण्यासाठी नारंगी नदीतीरी गेल्या होत्या. अचानकपणे लहान मुलगा गौरव जाधव याचा पाय घसरून तो नदीच्या पाण्यात पडला. यावेळी त्याला वाचवण्यासाठी स्वप्निल या मोठ्या भावाने देखील नदीच्या पाण्यात उडी घेतली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे आणि पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडू लागले. आपल्या पोटची दोन्ही मुलं पाण्यात बुडत असल्याचे पाहून आईने देखील पाण्यामध्ये उडी घेतली. मात्र आईलाही पोहता येत नसल्यामुळे आई पाण्यात बुडू लागली.

    दरम्यान हे दृश्य परिसरातील काही शेतकऱ्यांनी पाहिले असता त्यांनी चराट फेकून आईला वर काढले. मात्र दुर्दैवाने दोन्ही भावंडांना वाचवण्यात त्यांना अपयश आले. पाण्यात बुडणाऱ्या दोन भावंडांचा त्यांचा आईच्या डोळ्यासमोरच करुण अंत झाला. या घटनेनंतर दोन्ही भावंडांचे मृतदेह येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविचछेदनासाठी आणण्यात आले. या घटनेमुळे येवला तालुका हळहळला असून उंदीरवाडी येथील जाधव कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    मराठा आंदोलन पेटलं, छत्रपती संभाजीनगर ते हैद्राबाद रेल्वे पाऊण तास खोळंबली

    आईची माया ही अपरंपार असते. याचा प्रत्यय नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या उंदीरवाडी येथे आला आहे. आईला पोहता येत नसताना देखील आपल्या दोन बुडणाऱ्या मुलांना वाचवण्यासाठी आईने कुठलाही विचार न करता जीवाची परवा न करता थेट नदीपात्रात उडी घेतली. हा प्रकार वेळीच परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात आला. या घटनेत पाण्यात बुडणाऱ्या आईला वाचवण्यात यश आले. मात्र दुर्दैवाने दोन्ही सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed