• Mon. Nov 25th, 2024

    मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी सहा महिन्यांचं वेटिंग,अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर

    मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी सहा महिन्यांचं वेटिंग,अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील सिनेट निवडणूकीचा नवा कार्यक्रम विद्यापीठाने जाहीर केला असून आता २१ एप्रिलला सिनेटसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील निवडणूक जवळपास सहा महिने लांबणीवर गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

    यापूर्वी मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणूकीसाठी १० सप्टेंबरला मतदान होणार होते. मात्र मतदारयादीत गोंधळाच्या आरोपांमुळे विद्यापीठाने ही निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे. आता नव्याने मतदार नोंदणी करण्याचा निर्णय विद्यापीठाने घातला आहे. विद्यापीठाने निवडणूकीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार सोमवारी ३०, ऑक्टोबरपासून मतदार नोंदणीला सुरुवात केली आहे. इच्छुकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येईल. तर विद्यापीठाकडून या मतदार नोंदणी अर्जांची १ डिसेंबर ते २५ फेब्रुवारी या कालावधीत छाननी केली जाणार असून २६ फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

    ‘सुल्तान ऑफ स्विंग’ने जसप्रीत बुमराहचे तोंडभरून कौतुक; दिग्गज गोलंदाज म्हणाला- जस्सी तर सर्वांचा बाप

    विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार निवडणूकीची अधिसूचना २९ फेब्रुवारीला काढण्यात येणार आहे. निवडणूकीत उभे राहण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे ११ मार्चपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. सिनेटच्या पदवीधर मतदारसंघासाठी २१ एप्रिलला मतदान घेतले जाणार आहे. तर मतमोजणी २४ एप्रिलला केली जाणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे.
    मराठा आरक्षणासाठी पाठिंबा जाहीर करत एकनाथ शिंदे यांच्या खासदाराचा राजीनामा

    आधी नोंदणी केल्यांना शुल्क भरण्यापासून दिलासा

    मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीच्या मतदार यादीवर भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर याप्रकरणी चौकशी करून विद्यापीठाने नव्याने मतदार नोंदणीचा निर्णय घेतला आहे. तसेच यापूर्वीची यादी बाद ठरविली आहे. सिनेट निवडणूकीच्या मतदार नोंदणीवेळी पात्र पदवीधरांकडून २० रुपये शुल्क विद्यापीठ आकारते. मागील नोंदणीवेळी विद्यार्थ्यांनी हे शुल्क जमा केले होते. आता नव्याने मतदार नोंदणी करताना ज्या पदवीधरांनी आधी शुल्क भरून नोंदणी केली आहे, त्यांना दिलासा मिळाला आहे. आधी नोंदणी केलेल्या मतदारांना त्यांच्या जुन्या लॉगिन आयडीमधून पुन्हा नोंदणी करताना नव्याने कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. मात्र या उमेदवारांना लॉगिन आयडी पासवर्ड आठवत नसल्यास त्यांना पुन्हा नव्याने नोंदणी करावी लागेल. त्यासाठी विद्यापीठाकडून २० रुपयांचे शुल्क आकारले जाईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
    Beed Curfew : बीडमध्ये जाळपोळ, बसेसची तोडफोड, अखेर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, संचारबंदी लागू
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed