• Mon. Nov 25th, 2024
    मालेगावातून २ बहिणी कल्याणमध्ये आल्या; हॉटेलबाहेर गाडी पार्क केली, तेवढ्यात अनर्थ, अन् पोलिसात धाव

    कल्याण: नाशिक जिल्ह्यातील मालेगावहून काही कामानिमित्त कल्याणमध्ये आलेल्या नोकरदार तरूणींना कल्याणच्या चोरट्यांनी अवघ्या २५ मिनिटांत चांगलाच हिसका दाखवला आहे. हॉटेलात नास्ता करण्यासाठी गेलेल्या दोघा बहिणींची कार फोडून चोरट्यांनी त्यातील ३ लाख ६८ हजार रुपये किंमतीचा ऐवज लंपास केला. त्यातील एका बहिणीने दिलेल्या तक्रारीनुसार महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
    कुटुंब संपलं! परिवारावर दूधातून विषप्रयोग, दोघींच्या गळ्यावर खुणा; ७ मृत्यूंचं गूढ उकललं
    या संदर्भात चैताली पन्नालाल मोरे (२९, रा. शांती निकेतन चौक, मालेगाव, जिल्हा – नाशिक) या तरुणीने फिर्याद दाखल केली आहे. ही तरूणी तिची बहीण लिलानीसह काही कामानिमित्त कल्याण पश्चिमेत आली होती. शनिवारी सकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास ही तरूणी तिची एम एच १५/ एच यू / ३५३८ क्रमांकाची होंडा सिटी कार पार्क करून समोरच असलेल्या गुरूदेव हॉटेलमध्ये चैताली बहीण लिलानी हिच्यासह नाश्ता करण्यास गेली. २५ मिनिटांनी अर्थात ७.१० वाजता हॉटेलमधून बाहेर आल्यावर कारकडे येताच या बहिणींना धक्काच बसला. कारच्या डाव्या बाजूस असलेली काच फुटलेल्या अवस्थेत आढळून आली. या कारमध्ये ठेवलेल्या चारही बॅगा दिसेनाश्या झाल्या.

    ज्या क्षत्रिय मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र नको त्याने घेऊ नये, हा लढा गरीबांसाठी | बाळासाहेब सराटे

    या बॅगांमध्ये लॅपटॉप, आयपॅड, ज्वेलरी सेट, आधार कार्ड, क्रेडिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, कंपनीचे ओळखपत्र, बहिण लिलानी हिच्या बॅगेत महागडा लॅपटॉप, कॉस्मेटिक सामान, कपडे गॉगल, चष्मा, आदी ३ लाख ६८ हजार रूपये किंमतीचा ऐवज होता. या बॅगा लंपास झाल्यामुळे दोन्ही बहिणी भयभीत झाल्या. आजूबाजूला त्यांनी चौकशी केली. मात्र कुणीही माहिती देऊ शकले नाही. त्यानंतर तेथील माहितगारांनी पोलीस ठाण्याचा पत्ता दिला. या बहिणींनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात जाऊन आपली कैफियत मांडली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर चैताली मोरे हिच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. घटनास्थळी लावलेल्या सीसीटीव्हीतील फुटेज तपासून पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed