• Sat. Sep 21st, 2024
लातुरात पुनम मॅचिंग सेंटरला आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल, लाखोंचे नुकसान

लातूर: लातूर शहरात एका तीन मजली इमारतीला आग लागून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज गंजगोलाईतील कापड दुकानाला आग लागली. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईतील कापड लाईनला असणाऱ्या पूनम सेंटरला आग लागली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या. त्यांनी तातडीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आग आटोक्यात आली आहे.
कतारमध्ये ८ भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा, पीडित कुटुंबाचं म्हणणं काय? सरकार काय पावलं उचलतंय?
लातूर शहरात गंजगोलाई ही मुख्य बाजारपेठ आहे. या गोलाईत कापड गल्लीत महिलांच्या कपड्यांसाठी पूनम मॅचिंग सेंटर प्रसिद्ध आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आसलेल्या या सेंटरला आज रात्री नऊच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावर अचानक आग लागली. त्यामुळे दुकानात काम करणाऱ्या कामगारांनी बाहेर धाव घेतली. घटनेची माहित तात्काळ अग्निशमन विभागाला देण्यात आली. कापड गल्ली अरुंद असली तरीही महिती मिळताच अग्निशमन विभागाच्या तीन गाड्या घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या. त्यांनी तातडीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आग आटोक्यात आली आहे.

जगलो तर तुमचा नाहीतर समाजाचा; क्षत्रियाने लढायचं असत | मनोज जरांगे

दरम्यान आग लागलेल्या दुकानाच्या बाजुच्या कापड दुकानवाल्यांनी आपली दुकाने तात्काळ बंद केले होते. तसेच अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आल्याने पुढचा अनर्थ टळला आहे. मात्र या अगीत मोठ्या प्रमाणात कपडे जळाल्याने लाखोंचे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनास्थळी गांधी चौक पोलीस दाखल झाले असून घटनेचा पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आगीची माहिती मिळताच माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी घटनास्थळी हजर होत नुकसानीची पाहणी केली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही. लातूर शहरात दुकानाला आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र आग कशी लागली हे बहुतांश वेळा समजू शकले नाही. विजेच्या प्रवाहात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed