• Mon. Nov 25th, 2024
    दिवाळीला आधीच जाण्याचा प्लॅन असेल तर थांबा, काही गाड्या रद्द तर काहींच्या वेळा बदलल्या

    नागपूर : मध्य रेल्वेत सोलापूर विभागातील दौंड आणि मनमाड विभागातील विसापूर आणि बेलवंडे स्थानकांदरम्यान दुहेरीकरण सुरू करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याने त्याचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊन काही गाड्यांच्या वेळांत बदल होईल, तर काही गाड्या विशिष्ट वेळासाठी थांबवून ठेवण्यात येतील.

    गाड्यांच्या वेळातील बदलांचा तपशील असा-

    २९ ऑक्टोबर २०२३- १२६२७ बेंगळुरू – नवी दिल्ली एक्सप्रेस ५० मिनिटे थांबवून ठेवली जाईल. २२६८५ यशवंतपूर- चंदीगड एक्सप्रेस २५ मिनिटे थांबेल.

    ३० ऑक्टोबर २०२३- पुणे- जबलपूर एक्सप्रेस ४५ मिनिटे थांबवली जाईल. ११०७८ जम्मू तवी- पुणे एक्स्प्रेस ३० मिनिटे थांबविली जाईल.

    १ नोव्हेंबर २०२३- ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस २ थांबविली जाईल. ११४०९ दौंड- निजामाबाद एक्सप्रेस १ थांबेल. ११०३३ पुणे- दरभंगा एक्सप्रेस २० मिनिटे थांबवली जाईल. नियमन केले जाईल.

    ३१ रोजी ११०७८ जम्मू तवी- पुणे एक्स्प्रेस २० मिनिटे, १ नोव्हेंबर रोजी १२७८० हजरत निजामुद्दीन-वास्को-द-गामा एक्सप्रेस २० मिनिटे, २ तारखेला ११०७७ पुणे- जम्मूतावी एक्सप्रेस १ तास थांबवली जाईल.

    *** वळविण्यात आलेल्या गाड्या अशा-

    ११०७८ जम्मू तावी- पुणे एक्सप्रेस १ नोव्हेंबर रोजी मनमाड – इगतपुरी – कल्याण – पनवेल – कर्जत -लोणावळा मार्गे वळवली जाईल

    १२७८० हजरत निजामुद्दीन- वास्को-द-गामा एक्सप्रेस २ नोव्हेंबर रोजी मनमाड- इगतपुरी- कल्याण- पनवेल- कर्जत- लोणावळा- पुणे मार्गे वळवण्यात येईल.

    ***वेळांत बदल

    ०२१४३ पुणे – नागपूर ही ३ नोव्हेंबर रोजीची विशेष गाडी १६.०० ऐवजी १८.१५ वाजता सुटेल. २२१२३ पुणे- अजनी एक्स्प्रेस ३ तारखेला १५.१५ ऐवजी १६.१५ वाजता सुटणार आहे.

    ०१४३१ पुणे – गोरखपूर विशेष ३.११.२०२३ रोजी १६.१५ ऐवजी १९.१५ वाजता सुटेल.

    *** रद्द झालेल्या गाड्या अशा-

    ११४०९ दौंड -निजामाबाद पॅसेंजर ३०, ३१ ऑक्टोबर तसेच २ व ३ नोव्हेंबर रोजी रद्द राहील.
    ११४१० निजामाबाद- दौंड पॅसेंजर १, २, ४ व ५ नोव्हेंबर रोजी रद्द.
    ०१४१३ निजामाबाद – पंढरपूर पॅसेंजर ३१ ऑक्टोबर, १, ३ व ४ नोव्हेंबर रोजी रद्द करण्यात येईल.
    ०१४१४ पंढरपूर- निजामाबाद पॅसेंजर १, २, ४ व ५ नोव्हेंबर रोजी रद्द केली जाईल, असे मध्य रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed