• Sat. Sep 21st, 2024
आधी मराठा आरक्षण, मगच गावचं पुढारीपण; ३ ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा; जरांगेंना पाठिंबा

जळगाव: राज्यात मराठा आरक्षणावरुन मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण चालू केले आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना बंदी घालण्यात आली असून सर्वपक्षीय नेत्यांना याचा फटका बसत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जळगावमधील तीन ग्रामपंचायत सदस्यांनी राजीनामे दिले आहेत.

मराठा आरक्षणा मिळावे यासाठी अनेक ठिकाणी युवकांनी आपले आयुष्य संपवल्याच्या दुर्देवी घटना घडल्या आहेत. राजकीय पुढाऱ्यांना मराठा समाजाकडून घेराव घालत आरक्षणाबाबतीत प्रश्नांची सरबत्ती करण्यात आहे. अशातच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी भडगाव तालुक्यातील कजगाव ग्रामपंचायतीच्या तीन सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. यात दोन महिला सदस्यांचा समावेश आहे. पल्लवी पाटील, शोभाबाई बोरसे आणि समाधान पवार या ग्रामपंचायत सदस्यांचा यात समावेश आहे. सरपंच रघुनाथ महाजन यांच्याकडे त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे सुपूर्द केले. शिवसेना ठाकरे गटाचे कजगाव शहरप्रमुख दिनेश पाटील यांनीही आपला पदाचा राजीनामा दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र झाल्यास काय? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
कजगाव येथील वरील चारही जणांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. दिनेश पाटील व पल्लवी पाटील हे पती पत्नी आहेत. राजीनामा पत्रात या सदस्यांनी म्हटले आहे की, गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. मनोज जरांगे-पाटील यांनी समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. त्यांना पाठिंबा म्हणून राजीनामा देत आहोत. या तीनही सदस्यांनी आपला राजीनामा गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरपंचाकडे दिला. जोपर्यंत आम्हाला आरक्षण देत नाही, तोपर्यंत आम्ही बसणार नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

गावबंदीच्या निर्णयाचा धसका, बारामती दौरा रद्द, माळेगाव कारखान्याच्या कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed