• Sat. Sep 21st, 2024

तरुणांनो काळजी घ्या! ‘या’ ५ कारणांमुळे तुम्ही होऊ शकता पॅरालिसीसचे शिकार, वेळीच सवयी सुधारा

तरुणांनो काळजी घ्या! ‘या’ ५ कारणांमुळे तुम्ही होऊ शकता पॅरालिसीसचे शिकार, वेळीच सवयी सुधारा

मुंबई: बदलती जीवनशैली, अतिरिक्त ताणतणावांमुळे तरुणांमध्ये स्ट्रोक येण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. ‘गोल्डन अवर’मध्ये या रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळाले, तर त्यांचे प्राण वाचू शकतात, याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले. ताणतणाव, धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, रक्तवाहिन्यांचे आजार यामुळे स्ट्रोकचे प्रमाण वाढते आहे.

स्ट्रोक आल्यानंतर मेंदूचा रक्तप्रवाह विस्कळीत होतो. यामुळे मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होत नाही, तसेच शरीराची एक बाजू लुळी पडते. अशक्तपणा येणे, बोलण्यात किंवा गोष्टींचे आकलन होण्यामध्ये अडचणी येणे, संभ्रमावस्था निर्माण होण्यासारखा त्रास होतो. रक्तवाहिन्यांवर ताण येऊन रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. धूम्रपान, अंमली पदार्थांचा वापर, ताणतणावामुळे स्ट्रोकची समस्या उद्भवते.

गोल्डन अवर महत्त्वाचा

जे रुग्ण साडेचार तासांत यासाठी वैद्यकीय उपचार घेतात त्यांना थ्रोम्बोलिसिस आणि सहा ते बारा तासांपर्यंत मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी या सूक्ष्म उपचारपद्धतीचा वापर करता येतो. मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्यात २० ते २५ युवा रुग्ण या स्वरूपाची वैद्यकीय मदत घेतात. त्यामुळे योग्य वेळी वैद्यकीय मदत घेण्याची गरज न्यूरोलॉजिस्ट डॉ. पवन पै यांनी व्यक्त केली.

केसस्टडी

रुग्ण मोहन पाटील (नाव बदलले आहे) यांचे वजन १२० किलो होते. रुग्णाने वजन कमी करण्यासाठी जिममध्ये जाण्याचा निर्णय घेतला. वजन उचलल्यामुळे त्यांना मान दुखणे, चक्कर येणे, उलट्या होण्याचा त्रास सुरू झाला. अचानक जड वजन उचलल्याने रुग्णाच्या धमनीवर परिणाम झाला. गोल्डन अवरमध्ये वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा! डेंगीच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ, गेल्यावर्षी पेक्षा दुप्पट पेशंट
कारणे कोणती

– जंक फूड, तसेच तळलेल्या पदार्थांचे सेवन, बैठी जीवनशैली, धूम्रपान, व्यायामाचा अभाव, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि बिघडलेले लिपिड प्रोफाइल यामुळे स्ट्रोक येण्याचे प्रमाण वाढते.
-रक्तदाब, रक्तातील साखर, कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित न करणे
– संसर्गजन्य आजाराच्या वेळी योग्य प्रकारची काळजी न घेतल्यास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed