धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानींकडे २० कोटी रुपयांची मागणी केली आणि जर पैसे दिले नाहीत तर अंबानी यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
पोलिसांकडून तपास सुरु
मीडिया रिपोर्ट्सनुसार, धमकी देणाऱ्या ईमेलमध्ये लिहिले आहे की, ‘जर तुम्ही आम्हाला २० कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम शूटर आहेत.’ असा ईमेल मिळाल्यानंतर मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींनी तक्रार केली आणि या आधारे मुंबईच्या गमदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.
गेल्या वर्षीही धमकी मिळालेली
दरम्यान, मुकेश अंबानींना धमकी मिळण्याचीही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी गेल्या वर्षी बिहारमधील दरभंगा येथील एका व्यक्तीला मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. राकेश कुमार मिश्रा असे या आरोपीचे नाव असून तो बेरोजगार असून त्याने मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांना मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल उडवून देण्याची धमकीही दिली होती. तर फेब्रुवारी २०२१ मध्ये मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवास स्थानाबाहेर २० स्फोटक जिलेटिन काठ्या आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. पत्रात “हा फक्त ट्रेलर आहे” असे लिहिले होते.