• Sat. Sep 21st, 2024

फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन पतीने घेतले वाहन, बायकोला सतत कर्जाची चिंता, घरी कोणी नसताना संपवलं आयुष्य

फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन पतीने घेतले वाहन, बायकोला सतत कर्जाची चिंता, घरी कोणी नसताना संपवलं आयुष्य

जळगाव : चाळीसगाव तालुक्यात मेहुणबारे येथे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या करत जीवन संपविल्याची घटना सोमवारी उघड झाली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शीतल बापु पाटील (वय ३५, रा. बहुर ता. चाळीसगाव) असे मयत महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील बहुर गावात पाटील कुटुंबीय वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे दीड एकर शेती होती. त्यावरच घराचा प्रपंच सुरू आहे. शेतीला जोडधंदा व्हावा, म्हणून शीतल यांचे पती बापू पाटील यांनी एका फायनान्स कंपनीकडून साडेचार लाखांचे कर्ज काढून मालवाहू वाहन घेतले. त्यात बचत गटाचे देखील चार लाखांचे कर्ज होते. हे कर्ज कसे फेडणार याची शीतल यांना सतत चिंता लागलेली होती. मी सर्व कर्ज फेडून टाकेन, तु चिंता करू नको असा धीर देत शीतल यांचे पती नेहमी समजूत काढत होते.
सख्खा भाऊ बनला पक्का वैरी, नोकरीसाठी बहिणींची माया विसरला, महिनाभर प्लॅनिंग, थंड डोक्याने बहिणींना संपवलं

दरम्यान, रविवारी रोजी सायंकाळपर्यंत विवाहितेचे पती शेतात होते. तर मुले गावातच देवीच्या आरतीला गेली होती. सासरे लहान दिराकडे तर सासू गावी गेलेली होती. पती शेतातून घरी आले असता महिलेने कर्जाची चिंता वाटत असल्याचे पतीला सांगितले. पतीने पत्नीची समजूत काढत देवीची आरती करण्यास निघून गेले. काही वेळाने दोन्ही मुले व पती घरी आले असता शीतल पाटील या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आल्या. आईची अवस्था पाहून दोन्ही मुलांनी आणि पतीने एकच हंबरडा फोडला. यावेळी ग्रामस्थांनी महिलेला दवाखान्यात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी मेहूणबारे पोलीस ठाण्यात पतीने दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

जळगावात अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार; खून करून मृतदेह गुरांच्या गोठ्यातील चाऱ्यात लपवला

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed