वर्षानुवर्षे, ललित कला समाजमधील नवरात्रीचा कार्यक्रम अधिकाधिक चांगला आणि भव्य होत आहे. या वर्षी २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान तीन दिवस पारंपरिक ‘गोलू’ उत्सव साजरा होत आहे.
गोलू हे दक्षिण भारतात शरद ऋतूतील सणासुदीच्या काळात, विशेषत: नवरात्रोत्सवादरम्यान बाहुल्या आणि मूर्तींचे केले जाणारे उत्सवी प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन सामान्यत: एखाद्या थीमवर आधारित असते. हिंदू मजकुरांपासून ते विवाह सोहळे, दैनंदिन देखावे आणि लहान स्वयंपाकघरातील भांडी इ. इथे पाहायला मिळतात.
गोलू परंपरा फक्त बाहुल्याच दाखवत नाही; तर कलात्मक संगीताची देखील अनुभूती देते. महाकाव्य कथांपासून ग्रामीण जीवनापर्यंत आणि समकालीन घटनांपर्यंत वेगवेगळ्या थीमसह अद्वितीय आणि नाविन्यपूर्ण देखावे निर्माण करत सर्वांना एकत्र आणते.
यावर्षी या बाहुल्यांचे भव्य प्रदर्शन ललित कला समाज येथे भरत असून इथल्या अनेक कथा न चुकवण्यासारख्या आहेत. या कार्यक्रमासाठी आयोजित केलेल्या नृत्य आणि संगीताच्या कार्यक्रमांची देखील मेजवानी आहे. रसिकांना आकर्षक वाटतील असे अनेक स्टॉल्स देखील आहेत. इथे उपस्थित राहून उत्सवात सहभागी होते देवी मातेचे आशीर्वादही घेण्याचे आवाहन ललित कला समाजातर्फे करण्यात येत आहे.