या प्रकरणी अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजी नगरमध्ये अमली पदार्थाचे उत्पादन करणारा कारखाना असल्याची माहिती डीआरआयच्या पथकाला मिळाली होती. डी आर आय अहमदाबादच्या झोनल युनिट आणि गुन्हे शाखा अहमदाबाद पोलीसांनी २० ऑक्टोबर रोजी नारकोटिक्स ड्रग्स आणि सायकोट्रापिक पदार्थाच्या अंतर्गत जिल्ह्यातील विविध ठिकाणी शोध मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर पैठण रोडवरील कांचनवाडी येथील एका आरोपीच्या निवासस्थानाची झडती घेतली असता त्याच्या घरातून वरील साठा पथकाने जप्त केला.
तसेच पैठण एमआयडीसी मधील महालक्ष्मी इंडस्ट्रीज नावाचा कारखाना हा मेफेड्रोन आणि केटामाईंच्या उत्पादनात गुंतलेला असल्याच्या माहितीवरून या ठिकाणी पथकाने तपासणी केली असता ४.५ किलो मेफेड्रोन, ४.३ किलो केटामाईन आणि सुमारे ९.३ किलो वजनाचे मेफेड्रोनचे आणखी एक मिश्रण जप्त केले. या अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थाचे बेकायदेशीर बाजार मूल्य हे २५० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. जप्त केलेले हे सर्व पदार्थ एनडीपीएस कायदा १९८५ च्य संबंधित तरतुदीनुसार जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत मुख्य सूत्रधारासह दोन जणांना एनडीपीएस कायद्यांच्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
गुजरात येथून हे कोकेन छत्रपती संभाजी नगरमध्ये आणले जात होते, व या ठिकाणाहून इतर ठिकाणी असलेल्या डिलर्सना पुरवठा केला जात होते. त्यामुळे जितेश कुमार आणि संदीप या दोघांच्या माध्यमातून हे कोकेन कोणाकोणाला पोहोचवले जात होते, असा प्रश्न आता उपस्थित होत असून पुढील तपासात आणखी मोठे मासे हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News