• Sat. Sep 21st, 2024

मराठा आरक्षण: राजकीय नेत्यांना गावबंदीचं लोण साताऱ्यात, वडूथ गावात पहिली ठिणगी

मराठा आरक्षण: राजकीय नेत्यांना गावबंदीचं लोण साताऱ्यात, वडूथ गावात पहिली ठिणगी

सातारा : मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राजकीय नेते मंडळीबाबत सकल मराठा समाजामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील पहिली ठिणगी वडूथ गावात पडली असून, सातारा तालुक्यातील वडूथ येथे सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

सातारा तालुक्यातील वडूथ गावात मराठा समाजाच्या वतीने राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी असल्याचे फलक लावण्यात आले आहेत. आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाला दिलेली मुदत संपत आली आहे. राज्यभर ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावात महिनाभरापूर्वी मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी उपोषण सुरू होते. त्यानंतर आता जरांगे पाटील राज्यभर दाैरे करत आहेत. दहिवडी आणि फलटण येथे त्यांच्या जाहीर सभा झाल्या. त्यानंतर जिल्ह्यातील वडूथ गावाने फलक झळकवत पाठिंबा दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर वडूथ येथील सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वच राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्या आशयाचा फलक मुख्य चौकात लावला आहे. तसेच, मराठा आरक्षण मिळेपर्यंत आगामी काळातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याची टीपही लिहिली आहे.
Soyabean Rate : सोयाबीनच्या किरकोळ दरात वाढ, आठवड्यात कसे राहिले दर, जाणून घ्या सविस्तर
‘चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचं लक्ष्य’ मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष आणि नेत्यास गावात प्रवेश नाही. त्यामुळे आपली मान मर्यादा राखून गावात प्रवेश करावा. तसेच, कोणत्याही राजकीय पक्षाचे गावात बॅनर लावू नये, असा मजकूर असलेले भलेमोठे फलक मुख्य चाैकाचाैकात लावले आहेत. ते लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
वनडे क्रिकेटच्या इतिहासात दिग्गजांना जमले नाही असा वर्ल्ड रेकॉर्ड शुभमन गिलने केला; २६ धावात झाला मोठा विक्रम
वडूथ गावकऱ्यांनी एकत्र येऊन नेत्यांना गावामध्ये गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे . त्यामुळे आगामी काळात हे लोन जिल्हाभर पसरण्याची शक्यता वर्तवली जात असून, राजकारणी मंडळींनी याचा धसका घेतला आहे. साताऱ्यात या प्रकारचा निर्णय आणखी कोणती गावं घेतात हे लवकरच दिसून येईल.

भारताच्या १०० धावा झाल्यावर सामना का थांबवला, जाणून घ्या मैदानात नेमकं घडलं तरी काय…

चुलीत गेले नेते अन् चुलीत गेले पक्ष, राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीचा गावकऱ्यांचा निर्णय

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed