• Sat. Sep 21st, 2024

विश्वचषक सामन्यांवर सट्टेबाजी, पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई, लाखोंची रोकड जप्त, बुकीला अटक

विश्वचषक सामन्यांवर सट्टेबाजी,  पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई, लाखोंची रोकड जप्त, बुकीला अटक

पिंपरी : सध्या क्रिकेट विश्वचषकाचे सामने सुरू आहेत. मात्र, क्रिकेट सामन्यात सट्टा लवणाऱ्यामध्ये देखील वाढ झालेली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी सट्टेबाजांवर मोठी कारवाई केली आहे. गुंडा स्कॉड पथकाने छापा टाकत या बेटिंगचा पर्दाफाश केला अन् चाळीस लाखांच्या रोकडसह एकाला बेड्या ठोकल्या आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे.

दिनेश शर्मा असे अटक करण्यात आलेल्या बुकीचे नाव आहे. त्याच्याकडून ४० लाख रुपयांची रोकड देखील जप्त करण्यात आली आहे. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्यावर हा सट्टा सुरू होता.

छत्रपती संभाजीनगरात डीआरआयची मोठी कारवाई, २५० कोटींपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त, दोघांना अटक
याबाबत अधिक माहिती अशी की, समोर आलेल्या व्हिडिओमध्ये बुकी दिनेश शर्माने पोलिसांसमोर गुडघे टेकल्याचं दिसून येत आहे. तसेच चाळीस लाखांची रोकड ही स्पष्टपणे दिसते. इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका मॅचवर हा सट्टा खेळला जात होता.

‘क्रिकेट लाईव्ह लाईन गुरू’ या अँप वर अनेकांना आमिष दाखवलं जात होतं. इंग्लंड जिंकल्यास १ रुपयाला ६० पैसे तर साऊथ आफ्रिका जिंकल्यास ६१ पैसे असा भाव मॅचपूर्वी ठरलेला होता. पण मॅचची रंगत वाढत जाते तसा भाव चढत जात होता. शनिवारी ‘हाई-लगाई’ नावाने हाच सट्टा सुरू होता. तंत्रज्ञानाचा वापर करत गुंडा विरोधी पथकाने काळेवाडी येथील राहत्या घरावर छापा टाकला अन या बुकीचा पर्दाफाश केला.

मोबाइलमध्ये अश्लील फोटो दाखवले, नंतर शरीर संबंधांची मागणी; अल्पवयीन मुलीने नकार देताच घरमालकाच्या मुलाचे कूकर्म
त्यानंतर दिनेशने यापुढे सट्टा खेळणार नाही, माझी यातून सुटका करा, असं म्हणत तो पोलिसांसमोर गुडघे टेकू लागला. मात्र, पोलिस हरीश माने यांनी पोलिसी खाक्या दाखवत त्याला बेड्या ठोकल्या आहेत. घटनास्थळी चाळीस लाख ऐंशी हजारांची रोकड अन इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.

भारत विरुद्ध बांगलादेश सामना, स्टेडिअमबाहेर क्रिकेट प्रेमींच्या लांबच लांब रांगा

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed