• Sat. Sep 21st, 2024

कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनस बिलात मोठी चूक, १८ हजार कर्मचाऱ्यांना फटका, अखेर पुणे महापालिकेचा मोठा निर्णय

कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनस बिलात मोठी चूक, १८ हजार कर्मचाऱ्यांना फटका, अखेर पुणे महापालिकेचा मोठा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे: महापालिकेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्मचाऱ्यांसाठी बोनस, सानुग्रह अनुदानाची घोषणा केली. त्यासाठीचे कामकाजही सर्व विभागांनी सुरू केले. मात्र, सातव्या वेतन आयोगाऐवजी सहाव्या वेतन आयोगानुसार बोनस बिले तयार केली गेल्याने बोनससाठी पुन्हा बिल तयार करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावली आहे.

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीला बोनस दिला जातो. यामध्ये मूळ वेतन, महागाई भत्त्याच्या रकमेवर ८.३३ टक्के बोनस, २१ हजार रुपये सानुग्रह अनुदान याचा समावेश आहे. प्रशासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार प्रत्येक कर्मचाऱ्यास जवळपास वेतना इतकीच रक्कम मिळते. यंदा बोनसची रक्कम लवकरात लवकर कर्मचाऱ्यांच्या हाती पडावी, यासाठी लेखा व वित्त विभागाने बोनसची बिले काढण्याचा आदेश ९ ऑक्टोबर रोजीच काढला होता. एक तारखेनंतर लगेच हे पैसे बँक खात्यात जमा करण्याचा पालिकेचा प्रयत्न होता. मात्र, त्याला यश आलेले नाही. सर्वच विभागांमध्ये हा प्रकार घडल्याने सुमारे १८ हजार कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी पुन्हा नव्याने बिले तयार करण्यात येत आहेत.

तरुणांचा कॉलेजमध्ये वाद, बस स्थानकात समोरासमोर आले; पुन्हा वादाची ठिणगी पडली, अन्…
गेल्यावर्षीपासून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. बोनसची बिले काढताना या वेतन आयोगानुसार कार्यवाही करणे आवश्यक होते. पण सर्वच विभागांकडून सहाव्या वेतन आयोगाच्या वेतनानुसार बोनसची बिले तयार केली गेली. पण बोनसची रक्कम कमी असल्याचे लक्षात आल्यानंतर बिलांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ही चूक झाल्याचे निदर्शनास आले.

सातव्या ऐवजी सहाव्या वेतन आयोगानुसार बोनस बिल काढल्याने प्रत्येकाच्या बोनसमध्ये १० हजार ते २० हजार रुपयांपर्यंत तफावत दिसत आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्याने बोसनची बिले तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे बोनस जमा होण्यासही विलंब होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुणे कुठं राहिलंय? पाच पुणी झाली, पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, राज ठाकरेंची खंत

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed