सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांसमोर आपले तज्ज्ञ वकील पुरावे सादर करतील. मराठा आरक्षण मिळण्यासाठी एक मोठी संधी निर्माण झालेली आहे. मराठवाड्यातील कुणबी नोंदी असणारांना दाखले देण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समिती काम करत आहे. त्याचं देखील युद्ध पातळीवर काम सुरु आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
मराठा बांधवांना आवाहन करतो की टोकाचं पाऊल उचलू नका. मराठा समाजातील तरुणांचा जीव इतका स्वस्त आहे का? आपल्या कुटुंबाचा विचार केला आहे. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
मराठा समाजाला सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाकडून लाभ दिले जातात त्याची माहिती देण्यासाठी मराठवाड्यात शिबीरं घेत आहोत. मराठा समाजाच्या बांधवांना मी आवाहन करतो, की मी कुणालाही खोटं आश्वासन दिलेलं नाही, मी कुणाची फसवणूक केलेली नाही. मी राजकीय आयुष्यात जे बोललो ते केलेलं आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण द्यायची जबाबदारी घेतलेली आहे. आमचं सरकार पूर्णपणे मराठा समाजाच्या बाजूचं आहे, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जे करायचं आहे ते करणार आहे. कुणीही टोकाचं पाऊल उचलू नका, आई वडिलांचा, मुला बाळांचा विचार करा, तुमची तुमच्या कुटुंबाला गरज आहे. आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार बांधील आहे. अधिसंख्य पदं देण्यासाठी मी पुढं आलो होतो. अडीच ते चार हजार विद्यार्थी काम करत आहेत. जे जे लाभ द्यायचे आहेत ते युद्ध पातळीवर कसे मिळतील यासाठी सरकारनं निर्णय घेतलेला आहे. टोकाचं पाऊल उचलू नका, ते समाजाला आणि परिवाराला न परवडणारं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
Read Latest Maharashtra News And Marathi News