• Mon. Nov 25th, 2024
    तुळजाभवानी देवीची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा, काय आहे यामागील आख्यायिका? जाणून घ्या

    धारशिव: शारदीय नवरात्र महोत्सवात रविवारी वारी दुर्गाष्टमी दिवशी तुळजापुरातील श्री तुळजाभवानी देवीची महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री. तुळजाभवानीची आज २२ ऑक्टोबर रोजी नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली.

    ज्यावेळी महिषासुराने देवतांना हाकलून दिले व स्वत: स्वर्गाचा आनंद भोगू लागला. त्यावेळी साक्षात पार्वती अवतार असलेल्या श्री. तुळजाभवानी माता सर्व देवांच्या तेजापासून उत्पन्न झालेली जगदंबा माता भवानी आहे. तुळजाभवानी मातेने सर्व दैत्यांचा राजा महिषासुरचा वध केला व सर्व देवतांना स्वर्ग प्राप्तीचा आनंद दिला. त्यामुळे देवीला महाअलंकार घालण्यात येऊन महिषासुर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येते.अशी आख्यायिका सांगितली जाते.

    Ambabai : सातव्या दिवशी श्री करवीर निवासिनी अंबाबाई ची नारायणी नमोस्तुते देवीच्या रूपात पूजा
    तत्पूर्वी काल शनिवारी रात्री सातव्या माळेच्या दिवशी अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आला. त्यानंतर धूप आरती करण्यात आली.रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात पितळी गरुड वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

    संभाजीराजेंच्या उपस्थित पार पडला अंबाबाई-त्र्यंबोली देवी भेटीचा सोहळा, कोहळा मिळवण्यासाठी धक्काबुक्की

    Read latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *