• Sat. Sep 21st, 2024

आरक्षणाचा प्रश्न सोडवा, २५ तारखेनंतरचं आंदोलन तुम्हाला झेपणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा

आरक्षणाचा प्रश्न सोडवा, २५ तारखेनंतरचं आंदोलन तुम्हाला झेपणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारनं ओबीसीत समावेश करुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. राजकीय नेत्यांनी जीआर घेऊनच गावात प्रवेश करावा, असं जरांगे म्हणाले. सरकारनं जर २४ तारखेच्या आत मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर २५ तारखेपासून माझ्या मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून, मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून २५ तारखेपासून आमरण उपोषण पुन्हा सुरु करणार आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. त्या उपोषणात उपचार घेतले जाणार नाहीत, वैद्यकीय सेवा घेणार नाही, पाणी घेणार नाही, अन्न घेणार नाही. मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून कठोर उपोषण २५ तारखेपासून सुरु केलं जाणार आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.


राजकीय नेत्यांना गावबंदी

मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्या गावात एकाही महाराष्ट्रातील एकाही राजकीय नेत्याला येऊ दिलं जाणार नाही. आरक्षण घेऊनच गावात यायचं, नाहीतर आमच्या गावाच्या हद्दीपर्यंतही येऊ देणार नाही, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला. प्रत्येक सर्कलमध्ये साखळी उपोषण, सगळ्या गावात उपोषण होतील. महाराष्ट्रातील गावा गावात साखळी उपोषणं सुरु केली जाणार आहेत. २८ तारखेपासून साखळी उपोषणाचं रुपांतर आमरण उपोषणात होईल, असं देखील जरांगे म्हणाले.

सगळ्या गावात सर्कलच्या ठिकाणी किंवा मोठ्या गावाच्या ठिकाणी कायमस्वरुपी बसून राहायचं आहे. प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात प्रचंड संख्येनं मराठा समाजानं एकत्र येऊन सरकारला जागं करण्यासाठी कँडल मार्च काढायचे आहेत असं मनोज जरांगे यांनी सांगितलं.

मनोज जरांगे पुढे म्हणाले की ही दिशा आणि हे शांततेचं आंदोलन सुरु झाल्यानंतर सरकारला ते झेपणार नाही. २५ तारखेनंतर ते सरकारला झेपणार नाही. दोन टप्पे पाडल्याशिवाय मराठा समजाला न्याय मिळत नाही. मात्र, सरकारनं ही गोष्ट गांभीर्यानं घ्यावी, हे होणारं आमरण उपोषण आणि होणारे साखळी उपोषण महाराष्ट्रातील पाच कोटी मराठे चालवणार आहेत. मराठ्यांचा आरक्षणाचा विषय मिटवा, २५ तारखेला २८ च्या उपोषणाबाबत दिशा सांगितली जाणार आहे ती तुम्हाला पेलणार नाही, असा इशारा जरांगे यांनी सरकाला दिला.

तुम्हाला ऐकताना हे सहज दिसत असेल, पण हे शांततेचं युद्ध होणार आहे. हे तुम्हाला झेपणार नाही. या विषयाची तुम्ही गांभीर्यानं दखल घ्या आणि मराठा समाजाला २४ तारखेच्या आत आरक्षण जाहीर करा, असंही ते म्हणाले.
IND vs NZ LIVE Score: न्यूझीलंडला दुसरा धक्का, शमीने विल यंगची बोल्ड घेतली
मनोज जरांगे यांनी या पुढे बोलताना कोणीही उग्र आंदोलन करायची नाहीत, कोणीही आत्महत्या करायची नाही, असं सांगितलं. शांततेचं आंदोलन असल्यामुळं मराठा आरक्षण निर्णयप्रक्रियेत आणलं आहे. हे शांततेचं आंदोलन मराठा समजाला आरक्षण मिळवून देणार आहे. तुमचा मुलगा म्हणून प्राणाची बाजी लावून झुंज लावून लढायला तयार आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. तुमच्या पाठबाळाशिवाय, तुमच्या साथीशिवाय मराठा समाजाला न्याय मिळणार नाही, असंही ते म्हणाले.
रोहित शर्माचा धाडसी निर्णय, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात संघात केले २ मोठे बदल
तुमच्या विचारात आजपासून बदल करा, गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्यासाठी सगळेजण साथ द्या, असं मनोज जरांगे म्हणाले. २००१ च्या जीआरच्या आधारे ओबीसीतील समावेशाचा जीआर घेऊन नेत्यांनी यावं, असं मनोज जरांगे म्हणाले. आमच्या डोक्यावर पाय देऊन कुणाला मोठं करायला निघाला आहात, असा प्रश्न मनोज जरांगे यांनी केला.
रोहित शर्माचा पुन्हा एकदा मनमानी निर्णय; बुमराहने अनेकदा सांगितले तरी ऐकले नाही, बसला मोठा फटका

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed