• Sun. Sep 22nd, 2024
भारत हा हिंदूंचा देश आहे, शिवरायांनी मुस्लिमांनाही जवळ केले; डॉ. मोहन भागवतांचं वक्तव्य

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘भारत हा हिंदूंचा देश आहे. म्हणूनच येथे मुस्लिमांचाही योग्य सांभाळ केला जातो. जगभरात सगळीकडे भांडणे होत असताना भारतात या मुद्द्यावर भांडणे होती नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वाभिमानी हिंदू होते आणि त्यांनी मुस्लिमांनाही जवळ केले. त्यांच्या राज्यात सगळेच सुरक्षित होते,’ असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

प्रतापनगर शिक्षण संस्थेतर्फे शाळेच्या परिसरात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा कार्यक्रम होता. व्यासपीठावर प्रतापनगर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. गिरीश देशमुख, उपाध्यक्ष शंकर पहाडे आणि सहसचिव प्रशांत वैद्य उपस्थित होते. सरसंघचालक म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्वाभिमानी होते. त्यांचे शत्रुत्व हे विदेशी मुसलमानांशी होते, हे त्यांच्या कागदपत्रांवरून दिसून येते. त्यांनी अनेक माणसे गोळा केली आणि घडविली. त्यांच्यासोबत चारित्र्यसंपन्न माणसे होती आणि सत्ता मिळाल्यावरही ती तशी राहिली. त्यामुळे, शिवरायांचे राज्य हे लोकांचे राज्य झाले. सतत प्रयत्न, हिंमत, धैर्य, साहस, शक्ती, बुद्धी आणि पराक्रम या त्यांच्यातील गुणांचे आज अनुकरण करण्याची गरज आहे.’

भारत-न्यूझीलंड सामन्यावर पावसाचे काळे ढग, धरमशालामधील हवामानाचे ताजे अपडेट आले समोर
शाळेच्यावतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना याच कार्यक्रमात डॉ. भागवत यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांवरील पोवाड्याचे गायन केले. प्रास्ताविक प्रा. देशमुख यांनी केले. पहाडे यांनी डॉ. भागवत यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी तसेच नागरिक उपस्थित होते.

‘संपूर्ण जग हे कुटुंब’

सध्या आपल्या देशाचा चांगला काळ आहे. जगात आपल्या देशाची मान्यता वाढली आहे. अनेक अडचणींच्या प्रसंगी आपण जगाला मदत केली आहे. इतरांमध्ये आपल्याविषयी विश्वास वाढतो आहे. अशा काळात आपण देशाचा विचार करून कार्य केले पाहिजे. संपूर्ण जग हे बाजार आहे, असे सांगितले जात असताना आपण संपूर्ण जग हे कुटुंब असल्याचा संदेश देत आहोत’, असे सरसंघचालक म्हणाले.

चहापानासाठी २० लाखांचा खर्च; हिवाळी अधिवेशनातील ‘थ्री स्टार’ चहाची जोरदार चर्चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed