• Wed. Nov 27th, 2024
    खडकवासला बोगद्यासाठी विभागाकडे निधी नाही; अजित पवारांनी पर्याय सांगितला, म्हणाले…

    पुणे: खडकवासला ते फुरसुंगीपर्यंतच्या २८ किलोमीटरच्या बोगद्यासाठी जलसंपदा विभागाकडे निधी नाही. त्यामुळे पुणे महापालिकेने या दरम्यानची जागा ताब्यात घेऊन त्याचा टीडीआर द्यावा. टीडीआर दिल्यास त्याची मोठी रक्कम मिळू शकते. त्यातून बोगद्याचे काम होऊ शकते असा जलसंपदा विभागाने प्रस्ताव दिल्याची माहिती पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. याबाबत दसऱ्यानंतर बैठक घेऊन माहिती घेऊ असेही ते सांगायला विसरले नाहीत. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
    मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक; रावसाहेब दानवे यांच्या कार्यक्रमात गोंधळ, नेमकं काय घडलं?
    त्यावेळी खडकवासला ते फुरसुंगीच्या बोगद्याचे पुढे काय असे विचारता अजित पवार म्हणाले, ‘खडकवासल्याचे पाणी फुरसुंगीला कालव्याद्वारे जाते. पण त्याच ठिकाणी बोगदा केला तर अडीच ते तीन टीएमसी पाणी वाचू शकते. खडकवासला ते फुरसुंगीपर्यंतचा बोगदा करण्यासाठी जलसंपदा विभागाकडे निधी नाही. हा कालवा शहरातून गेला आहे. पाणी त्यातून वाहते आहे. दोन्ही बाजूने रस्ते असून काही जागा शिल्लक आहे. खडकवासला ते फुरसुंगीपर्यंतची जागा पुणे महापालिकने ताब्यात घ्यावी आणि त्याबदल्यात हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) द्यावा, असा प्रस्ताव जलसंपदा विभागाने दिला आहे.

    ‘उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बैठक घेतली होती. अशा गोष्टी फार नियमावर बोट ठेऊन करू नका, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले होते. प्रकल्पाच्या किंमती वाढत आहेत. यात नगरविकास, जलसंपदा, महसूल विभागांचा संबंध येत असल्याने त्यांनी सकारात्मकता दाखविली आहे. दसऱ्यानंतर त्याबाबत मी बैठक घेऊन त्याचा आढावा घेईन. त्यावेळी जलसंपद विभाग कोणत्या निर्णयापर्यंत आला आहे याची माहिती घेईल,’ असेही अजित पवार यांनी सांगितले. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात अजित पवार हे प्रथमच माध्यमांशी बोलले. त्यावेळी ससूनच्या अधिष्ठांतावर कारवाईबाबत बोलण्याचे त्यांनी टाळले.

    अपयश झाकण्यासाठी आमच्यावर खापर फोडण्याचा प्रयत्न, कंत्राटी भरतीवरून अशोक चव्हाणांचं फडणवीसांवर टीकास्त्र

    ते म्हणाले, यासंदर्भात पोलीस चौकशी करीत आहेत. त्याला अटक करून न्यायालयाने पोलीस कोठडीत टेवण्याचे आदेश दिले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीनंतर वस्तुस्थिती समोर येईल. या प्रकरणात आरोपीनेच आरोप केले आहेत, त्याबद्दल चौकशी करून काय झाले, कसे झाले, अशा बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. गृहमंत्रालयाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काही मंत्र्यांवर आरोप केले आहेत, त्याबाबत ‘विरोधी पक्ष आता सत्ताधाऱ्यांवर आरोप करत आहेत. त्यातून काहींनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारादेखील दिला आहे. या सर्व बाबींची चौकशी करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर काय नेमके घडलेले आहे. ते आपल्या सर्वांच्या समोर येईल,’ असेही ते म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed