• Mon. Nov 25th, 2024
    तूर कापसाच्या लागवडीसह शेतकऱ्याचा भलताच उद्योग, पोलीस शेतात पोहोचले अन् बेड्या ठोकल्या

    धुळे: नाशिक येथील ललीत पाटील ड्रग्स प्रकरण गाजत असतानाच धुळे जिल्हा पोलीस प्रमुख संजय बारकुंड यांनी अंमली पदार्थ तस्करी विरोधात कंबर कसले आहे. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग आणि थाळनेर पोलिसांनी केलेल्या दोन कारवाई करत सुमारे १ कोटी ५ लाखांचा गांजा जप्त केला आहे. त्यामुळे गांजाची शेती करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
    पाच दिवसांच्या नवजात बाळाने दिले चौघांना नवजीवन, ब्रेन डेड झाल्यावर कुटुंबाच्या निर्णयाने डॉक्टरही भावूक
    भुईमूग, तूर आणि कापूस पिकांची लागवड झालेल्या शेतात बेमालूमपणे गांजा शेती करण्याचा प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी शिरपूर तालुक्यात उघडकीस आणला. दोन ठिकाणी छापे टाकून एक कोटीपेक्षा अधिक रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिरपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना मिळालेल्या माहितीवरून भिवखेड पाडा, बभळाज शिवारात वन जमिनीवर गांजाची बेकायदेशीर लागवड झाल्याची खात्री करण्यात आली.

    यानंतर सहायक निरीक्षक दीपक पावरा यांच्या नेतृत्वाखाली पथक पाठविण्यात आले. महसूल विभागाचे अधिकारी, नायब तहसीलदार महेश साळुंखे यांच्यासह रवाना झालेल्या या पथकाने मुसा पावरा (रा. महादेव, शिरपूर) याच्या शेतात तपासणी केली. मुसाने भुईमूग आणि तूरीच्या शेतात गांजासदृश्य वनस्पतीची लागवड केलेली आढळली. या छाप्यात ४९ लाख ९९ हजार ३६५ रुपयांची १४२८.३९० किलोग्रॅम वजनाची झाडे पथकाने जप्त केली. या प्रकरणी शामसिंग वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुसाविरूद्ध थाळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

    राजीनामा दिला पण मी ठाकरेंसोबतच, मी शिवसैनिकच राहणार; पत्र व्हायरल झाल्यावर पदाधिकाऱ्याची प्रतिक्रिया

    दुसरी कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून हिसाळे येथील देवसिंग पावरा याच्या गोरक्षनाथ पाडा शिवारातील शेतात तपासणी करण्यात आली. तूर आणि कापूस पिकांत गांजाची लागवड केल्याचे आढळले. पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी यांच्यासह पथकाने ५६ लाख, आठ हजार ७५० रुपयांची एक हजार ६०२ किलो गांजाची तीन ते सहा फुट उंचीची झाडे जप्त केली. याप्रकरणी देवसिंगविरूद्ध महेंद्र सपकाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून थाळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *