• Mon. Nov 25th, 2024
    गरबा खेळताना दंड थोपटला; दोन गटात वाद, नंतर तरुणाला भेटण्यास बोलवलं, अन् नको ते घडलं

    धुळे: गरबा खेळण्याच्या ठिकाणी आणि दंड थोपटल्याच्या कारणावरून बुधवारी रात्री दोन गटात वाद झाला. या वादाचे रूपांतर नंतर तुंबळ हाणामारीत झाले. यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर हल्ला चढविण्यात आला. शिवाय घटनास्थळावर फायरिंग झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी धुळे शहरातील भाजपा नगरसेविकेचा मुलगा मित भामरे याच्यासह अन्य दोघांवरही खुनाचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल झाला आहे..
    तूर कापसाच्या लागवडीसह शेतकऱ्याचा भलताच उद्योग, पोलीस शेतात पोहोचले अन् बेड्या ठोकल्या
    याप्रकरणी जखमी तरूणाचा भाऊ महेश नंदुलाल बैसाणे, रा. इंदिरा नगर, गोंदूर रोड, धुळे याने देवपूर पोलिसांना दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, जीटीपी स्टॉपजवळील बडगुजर कॉलनीत तो आणि त्याचा भाऊ अरविंद बैसाणे याचेसह मित्र सचिन ठाकरे, यशोरत्न वाघ, चेतन सोनार, रोशन खैरनार हे दांडीया खेळण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी भाजपा नगरसेविका वंदना भामरे यांचा मुलगा मित भामरे, रा. गौतम नगर, वाडीभोकर रोड, धुळे दादू कपूर, रा. एकता नगर आणि प्रक्षिक वाघ यांच्यासोबत आणखी आठ-दहा जण होते. त्याठिकाणी खून्नस आणि दंड थोपटल्यावरून त्यांच्यात तणाव निर्माण झाला होता. हा वाद निवळल्यानंतर पुन्हा फोनवरून वाद झाला. रात्री ११ वाजेच्या सुमारास गोंदूर रोडवरील शनी मंदिर जवळ त्यांना बोलविण्यात आले. तेथेच हल्ल्याची घटना घडली.

    मुस्लीम मित्राला दिलेला शब्द पाळला; दर्ग्याचा जीर्णोद्धार करत हिंदू-मुस्लिम सलोखा जपला

    अरविंद बैसाणे याला मित भामरेने कानशिलात मारली. तसेच प्रक्षिक बाघ याने अरविंदला पाठीमागून धरून ठेवले असता मित भामरेने त्याच्याकडील चॉपरने अरविंदच्या कमरेच्यावर वार केला. यात तो गंभीर जखमी झाला. तसेच मित भामरे आणि दादू कपूर या दोघांनी त्यांच्याजवळील पिस्टलने महेश बैसाणेच्या दिशेने फायरिंग केले, यात तो बचावला. मारहाणीच्या घटनेत महेशचा मित्र चेतन सोनार हा देखील जखमी झाला आहे. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात आर्मॲक्ट तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न यानुसार गुन्हा दाखल झाला असून तिघेही आरोपी फरार झाले आहेत. त्यांचा तपास देवपूर पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *