• Sun. Sep 22nd, 2024

पुण्याला पाण्याचा ‘वाढीव’ कोटा मिळणार? अजित पवारांकडे मागणी, पुणेकरांचं निर्णयाकडे लक्ष

पुण्याला पाण्याचा ‘वाढीव’ कोटा मिळणार? अजित पवारांकडे मागणी, पुणेकरांचं निर्णयाकडे लक्ष

म. टा. प्रतिनिधी, पुणे : वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरणामुळे पुणे महापालिकेने पिण्याच्या पाण्यासाठी वाढीव कोटा देण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली आहे. मात्र, यंदा टेमघर वगळता खडकवासला प्रकल्प पूर्ण शंभर टक्के भरले नसल्याने पाणीसाठा कमी आहे. त्या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी कालवा सल्लागार समितीची बैठक होत आहे. त्या बैठकीत पुणे महापालिकेने वाढीव कोटा देण्याची मागणी केली असून त्याबाबत अजितदादा काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव या धरणांमध्ये यंदा १०० टक्के पाणीसाठा जमा झाला. मात्र, टेमघर यंदाच्या वर्षी अद्याप भरले नाही. त्यामुळे खडकवासला प्रकल्पांत यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमीच जमा झाला. आजमितीला खडकवासला साखळी प्रकल्पांमध्ये २७.५६ टीएमसी म्हणजेच ९४.५४ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीयाच वेळी २९.०८ टीएमसी म्हणजेच ९९.७७ टक्के पाणी उपलब्ध होते. त्या तुलनेत सुमारे दोन टीएमसी पाण्याची तूट आहे.

यंदा पावसाने उशिरा आगमन केले. जून महिन्याच्या शेवटी पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असली तरी जुलै महिन्यात फार समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप हंगामासाठी पुरेसा पाऊस झाला नाही. त्याकरिता खडकवासला धरणातून पाणी सोडावे लागले होते. दोन आठवड्यापूर्वी शेतासाठीचे आवर्तन बंद करण्यात आले होते.
अर्धशतक हुकले पण बाद होण्याआधी रोहित शर्माने शाहीद आफ्रिदीला दिला दणका; ODI क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर हिटमॅन
आता रब्बी हंगामासाठी शेतीला पाणी देण्याचे नियोजन जलसंपदा विभाग करीत आहे. कालवा सल्लागार समितीच्या आजच्या बैठकीत जलसंपदा विभाग शेतीला किती पाणी देता येईल तसेच पुण्याला किती पाणी देता येईल याचा आराखडा मांडणार आहे. ‘पुण्याला पिण्यासाठी पाणी देण्यास आमचे प्राधान्य आहे. पुण्याला गेल्या वर्षी २१ टीएमसी पाणी दिले होते. आता पालकमंत्र्यांच्या बैठकीत काय निर्णय होते ते पहावे लागेल,’ असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सागितले.
विराटने मॅच आणि मनंही जिंकली… बांगलादेशला धुळ चारत भारताने साकारला विजयी चौकार…
दरम्यान, जलसंपदा विभागाने महापालिकेला २०२३-२४ या वर्षासाठी केवळ १२.८२ टीएमसी पाणी कोटा मंजूर केला आहे. समाविष्ट गावांचा विचार करता, लोकसंख्येच्या तुलनेत हा कोटा अपुरा असल्याने हा कोटा वाढवून देण्यासाठी जलसंपदा विभागाला महापालिकेने पत्र पाठविले आहे. पालिकेने वर्षाला २०.९० टीएमसी पाण्याची मागणी केली. त्यामुळे आता अजितदादा पुण्याच्या पाण्याबाबत नेमका काय निर्णय घेतात याकडे जलसंपदा तसेच महापालिकेचे लक्ष लागून राहिले आहे.
रोहितच्या विकेटचा बदला विराट कोहलीने घेतला; एका चेंडूत बांगलादेशच्या संपूर्ण टीमची नशा उतरवली

पुणे पोलिसांनी १० पथकं लावली, तरी ललित पाटील मुंबई पोलिसांच्याच हाती कसा?; रवींद्र धंगेकरांना संशय

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed