• Mon. Nov 25th, 2024

    मिशन बारामती,मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन, मनसेचे अजित पवार अन् राज ठाकरेंनी टायमिंग साधलं

    मिशन बारामती,मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन, मनसेचे अजित पवार अन् राज ठाकरेंनी टायमिंग साधलं

    म. टा. प्रतिनिधी, पुणे :राज्यातील सध्याचे राजकारण पाहता या राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची गरज आहे. यातून राज्याचा जो विचका झाला आहे, त्यातून राज्याला बाहेर काढण्याची शपथ आपण घेऊ, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. महापालिकांच्या निवडणुका थेट २०२५ मध्येच होतील, असे भाकितही त्यांनी वर्तवले.

    कात्रज येथे वसंत मोरे यांच्यातर्फे आयोजित बारामती लोकसभा मतदार संघ मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
    पुण्याला पाण्याचा ‘वाढीव’ कोटा मिळणार? पालकमंत्री अजित पवारांकडे मागणी, पुणेकरांचं निर्णयाकडे लक्ष
    महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होतील, असे मी एकाला विचारले तर तो म्हणाला २०२५ मध्येच होतील. त्यामुळे आता सर्वात पहिल्यांदा एप्रिल मे महिन्यात लोकसभा निवडणूक होईल. त्यासाठी सर्वांनी तयारीला लागा. ज्या प्रकारे लोकांचे ध्रुवीकरण केले जात आहे. त्यातून या लोकांना जागा दाखवून देऊया, असे राज म्हणाले.

    दरम्यान, राज ठाकरे व अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. आज (शुक्रवारी) सकाळी ते पुण्यामधील एस.एम. जोशी सभागृहात पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेणार आहेत.
    रोहितच्या विकेटचा बदला विराट कोहलीने घेतला; एका चेंडूत बांगलादेशच्या संपूर्ण टीमची नशा उतरवली

    मला काका म्हणू नकोस

    बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी वसंत मोरे यांच्याकडे आहे. ते चांगले काम करताहेत. आणि येथेच त्यांना अजित पवारही सापडला आहे. मला कळेना हल्ली हे कोणत्याही पक्षात जातात काय ? हा बरोबरचा सहकारी आहे. पण, मला तू आयुष्यात चुकूनही काका म्हणू नको रे, असे राज ठाकरे अजित पवार या कार्यकर्त्याला उद्देशून म्हणाले आणि मोठा हशा पिकला.
    विजयी चौकारानंतर भारताला मिळाली अजून एक गुड न्यूज, सामना संपल्यावर नेमकं काय घडलं पाहा…
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed