• Mon. Nov 25th, 2024
    साखर कारखान्यांचे हिशोब तपासण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची फौज तयार, राजू शेट्टींचे वक्तव्य

    कोल्हापूर: जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील सर्वच साखर कारखान्यांचे हिशोब तपासण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची फौज तयार आहे. शासनाने आम्हाला कारखान्याचा हिशोब तपासाला परवानगी द्यावी ४०० रूपये एफ आर पी नव्हे तर दीड टक्क्यांनी रिकव्हरी सुध्दा वाढवून सिध्द करून दाखवू, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी कागल येथील शिवाजी चौकातून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले. आज आक्रोश पदयात्रेच्या तिसऱ्या दिवशी कागल तालुक्यातील सर्वच गावात पदयात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले.
    कर्नाटक पळवणार राज्यातील ऊस; महाराष्ट्राच्या एक पाऊल पुढे, सीमाभागातील कारखान्यांना ‘असा’ बसणार फटका
    साखर कारखान्यांनी यावर्षी साखर आणि उपपदार्थातून मुबलक पैसे मिळविले आहेत. अनेक साखर कारखान्यांनी प्रक्रिया खर्च अव्वाच्या सव्वा लावून ताळेबंद जुळविलेले आहेत. शिल्लक साखर व उपपदार्थाचे दर कमी दाखवून वाढलेला पैसा येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी मुरविला जाणार असल्याने साखर कारखानदार दुसरा हप्ता न देण्याची अडेलतट्टू भुमिका घेत आहेत. याबरोबरच राज्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे डिझीटल केल्याशिवाय यंदा गाळपास परवानगी देऊ नये, या दोन मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संस्थापक राजू शेट्टी दि. १७ ऑक्टोबरपासून शिरोळ येथील दत्त साखर कारखान्यापासून आक्रोश पदयात्रेस सुरूवात करून आज तिसऱ्या दिवशी ही पदयात्रा कागल याठिकाणी पोहचली.

    मला काका म्हणू नको, मनसेच्या अजित पवारांना राज ठाकरेंना सल्ला

    सकाळी ८ वाजता सांगाव येथून पदयात्रेस प्रारंभ होऊन सांगाव कागलमार्गे येऊन शाहू कारखाना कार्यस्थळावर ४०० रूपयाचा हप्ता दिल्याशिवाय गळीत हंगाम सुरू न करण्याचे निवेदन दिले. दि. १७ ऑक्टोबर पासून पदयात्रा सुरू होऊन गुरूदत्त, जवाहर, घोरपडे, शाहू, वारणा, क्रांती, वसंतदादा, राजारामबापू आदी ३७ साखर कारखान्यांवर २२ दिवस ५२२ किमी पदयात्रा चालत जाऊन ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत ही पदयात्रा सामील होणार आहे. जोपर्यंत ४०० रूपयांचा हप्ता दिला जात नाही. तोपर्यंत एकाही साखर कारखान्याची ऊस तोड सुरू होणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. पदयात्रेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सामील व्हावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed