याबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी हे ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या मुंबईतील कार्यालयात बैठकीसाठी गेले होते. बैठक आटोपून बाहेर येताच त्यांना रस्त्यावर असलेल्या कांदा विक्रेत्याने अचानक ओ साहेब पोते उचलायला जरा हात लावता का? अशी विचारणा केल्याची हाक ऐकू आली.
जिल्हाधिकारी डॉ.दयानिधी यांनी लगेच मागचा पुढचा विचार न करता त्यांनी तीन कांद्याची पोती उचलून डोक्यावर दिली. त्यांच्याबरोबर उपवनसंरक्षक राहुल पाटील काही अंतरावर होते त्यांनी ही हे क्षण आपल्या मोबाईल च्या कॅमेऱ्यात टिपले. सहकारी आपले चित्र टिपतायत याची जराही माहिती जिल्हाधिकारी डॉ.दयानिधी यांना नव्हती. तीन कांद्याची पोती उचलून देण्यासाठी मदत करत असताना राहुल पाटील यांना वाटले की, जिल्हाधिकारी दयानिधी यांचा एखादा फोटो काढावा आणि त्याच वेळी त्यांनी कॅमेऱ्याकडे बघितले.
याबाबत आय एफ एस अधिकारी राहुल पाटील लिहितात, असे अधिकारी खरोखर एक वेगळी छाप पडतात हे नक्की! फोटो बघितल्यावर एखाद्याला वाटेल की जाणीवपूर्वक हा फोटो काढलेला आहे परंतु तसे नाही. खरंतर कांद्याची पोती उचलून देण्यासाठी मदत करत असताना मलाच वाटले की राजा साहेबांचा एखादा फोटो काढावा व त्याच वेळी त्यांनी कॅमेऱ्याकडे बघितले. कामाला तत्पर परंतु समाजात वावरताना पद व प्रतिष्ठा बाजूला ठेवून सर्वसामान्यांसारखा वागणारा वागणारा हा आमचा मित्र राजा दयानिधी..
Read Latest Sangli News And Marathi News