पण हे घडलं तरी कसं आणि का? बापूराव पवार याने आपला चुलतभाऊ आणि भावजयीला इतक्या निर्दयीपणे वार करून संपवलं तरी का? घटनेपासून हाच प्रश्न पोलिसांना आणि नागरिकांना पडला होता. जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा संशयित आरोपीने घडाघडा बोलायला सुरुवात केली आणि तो भूतकाळात रमला. त्याने पोलिसांसमोर भूतकाळातील घडलेल्या घडामोडींचा पाढाच वाचला आणि दुहेरी हत्याकांड करण्याचे कारण उघडकीस आले.
संजय रामचंद्र पवार आणइ त्यांची पत्नी मनीषा आणि अल्पवयीन मुलगा असं त्याचं कुटुंब. माण तालुक्यातील आंधळी गावानजीक असलेल्या कासारवाडी रस्त्यावर वास्तव्याला आहेत. संशयित आरोपीही त्यांच्याच शेजारी राहतो. पण संजय पवार यांना बापूराव पवार याचा कधी संशयही आला नाही. पण पोलीस तपासात समोर आलेली हकीकत ऐकून पोलिसही थक्क झाले.
गेल्या दोन वर्षांपूर्वी संजय पवार यांच्या अल्पवयीन मुलाने बापूराव पवार यांच्या मुलीवर अत्याचार केला होता. या अत्याचाराची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात झाली होती. तिथून कायदेशीर सोपस्कारही पूर्ण पार पडले होते. मात्र, या कायदेशीर सोपस्कारातील एक गोष्ट खटकली अन् मुलीच्या वडिलांचा राग अनावर झाला अन् दुहेरी हत्याकांड घडलं. ही घटना दोन कुटुंब उद्धस्त करून गेली.
पवार पती-पत्नी हे त्यांच्या शेतातील ज्वारीचे कडवळ पिकाला पाणी आणि खत देण्यासाठी शनिवारी रात्री पवार दरा शिवारातील शेतात गेले होते. ते त्यांचं काम करत असताना अचानकपणे संशयित आरोपी दादासाहेब उर्फ बापूराव शहाजी पवार याने दोन वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात दाखल तक्रारीचे कारण. त्याच्यातून विरोधात गेलेल्या कायदेशीर बाबी या गोष्टींची मनात असलेली सल बापूरावने शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हे दुहेरी हत्याकांड घडवत मनातून काढून टाकली.
ही घटना नक्कीच दुर्दैवी आहे. बापूराव याने कायदा हातात घेणं चुकीचं होत. मात्र, जेव्हा बापूरावच्या बाबतीत त्याच्या मुलीवर अत्याचार होऊन देखील कायदेशीर गोष्टी त्याच्या विरोधात गेल्याने बापूरावने हे दुहेरी हत्याकांड केलं अन् गुन्हेगार व्हावं लागलं. एवढा मोठा गुन्हा करूनही जेव्हा बापूरावला दहिवडी पोलिसांनी अटक केली. तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारच दुःख, शल्य दिसत नव्हतं. या घटनेत नक्की कोण चुकलं? कायदा की बापूराव? हा प्रश्न जनतेला विचार करण्यास लावणारा आहे.