• Mon. Nov 25th, 2024
    आधी मंदिरात लग्न; नंतर एकत्र राहिले, अचानक पतीचं पलायन, सापडताच पत्नीला धमकी, नेमकं काय घडलं?

    धामणगाव: लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. मंदिरात लग्न करून काही दिवसांनी सोबत राहण्यास नकार देण्यात आला. या प्रकाराची वाच्यता न करण्यासाठी जीवे मारण्याची धमकीसुद्धा देण्यात आली. ही धक्कादायक घटना मंगरूळ दस्तगीर ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे.
    मध्यरात्री अचानक घरात आग; चिमुकली अडकली, अग्निशमन दलामुळे सुटका, नेमकं काय घडलं?
    मिळालेल्या माहितीनुसार, उमेश शालिकराम काळे (३५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित ३६ वर्षीय महिला ही पतीपासून विभक्त
    राहते. त्यांना दोन मुले आहेत. त्यांचा मोठा मुलगा हा शेतीची कामे करतो. त्याच्यासोबत काम करणाऱ्या उमेशचे त्यांच्या घरी नेहमी घरी येणे-जाणे होते. त्यातून पीडित महिला आणि उमेश यांच्यात ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यावर उमेशने महिलेला लग्नाचे आमिष दाखविले. लग्न केले तर तुला नवीन घर बांधून देईल, अशी बतावणीसुद्धा त्याने केली. त्यामुळे महिलेने त्याला होकार दिला.

    त्यानंतर उमेशने अनेकदा महिलेसोबत त्यांच्या घरी कुणी नसताना शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे महिलेने त्याच्याकडे लग्नाची मागणी केली.परंतु, उमेश टाळाटाळ करू लागला. महिलेने लग्नासाठी तगादा लावल्यावर उमेश तयार झाला. त्यानंतर त्यांनी एका मंदिरात एकमेकांच्या गळ्यात हार घालून लग्न केले. लग्नानंतर काही दिवस दोघे पती-पत्नीप्रमाणे राहिले. मात्र जून महिन्यात आईकडे जातो, असे सांगून उमेश निघून गेला. तो पुन्हा परत आला नाही. त्यामुळे पीडित महिला त्याच्या आईकडे गेली. उमेशच्या आईने तो येथे आलाच नसल्याचे सांगितल्यावर महिलेने मंगरूळ दस्तगीर ठाण्यात हरविल्याबाबत तक्रार दिली.

    प्रत वाचा, 2 महिन्यात निर्णय द्या असे कोणतेही आदेश कोर्टाकडून नाहीत | राहुल नार्वेकर

    दरम्यान, काही दिवसांनी अचानक पीडित महिलेला उमेश दिसला. त्यावेळी महिलेने त्याला विचारणा केली. त्यावर त्याने मला आता तुझ्यासोबत राहायचे नाही. मला हार टाकून केलेले लग्नसुद्धा मान्य नाही. तुला काय करायचे ते कर, असे म्हणून उमेशने पीडित महिलेला या प्रकाराची वाच्यता न करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे महिलेने मंगरूळ दस्तगीर ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी उमेशविरुद्ध बलात्कार आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *