• Sat. Sep 21st, 2024

गौतमी पाटीलच्या कार्यक्रम आयोजकांवर गुन्हा, विनापरवानगी आयोजन करून गर्दी जमवल्याचा आरोप

गौतमी पाटीलच्या कार्यक्रम आयोजकांवर गुन्हा, विनापरवानगी आयोजन करून गर्दी जमवल्याचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत जमावबंदीचे आदेश लागू असल्याने ऑर्केस्ट्रा ठेवण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही, पनवेलच्या वावंजे भागातील एका रिसॉर्टमध्ये गौतमी पाटील हिच्या ऑर्केस्ट्राचे विनापरवानगी आयोजन करून गर्दी जमवण्यात आली होती. त्यामुळे पनवेल तालुका पोलिसांनी या कार्यक्रमाचे आयोजक तसेच सहारा रिसॉर्टचे मालक व व्यवस्थापक यांच्या विरोधात मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नवरात्र व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर, नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पाच किंवा अधिक लोकांचा जमाव करण्यास तसेच पूर्वपरवानगीविना कार्यक्रम घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरीही वावंजे येथील अंकीत वर्मा याच्या वाढदिवसानिमित्त १२ ऑक्टोबर रोजी रमाकांत चैरमेकर याने वावंजे येथील सहारा रिसॉर्टमध्ये गौतमी पाटील हिच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन केले होते. त्यासाठी चैरमेकर याने पोलिसांकडे परवानगीची मागणी केली होती.

आधी मंदिरात लग्न; नंतर एकत्र राहिले, अचानक पतीचं पलायन, सापडताच पत्नीला धमकी, नेमकं काय घडलं?

जमावबंदीचे आदेश लागू असल्याने त्याला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र त्यानंतरही आयोजकांनी वावंजे येथील या रिसॉर्टमध्ये गौतमीच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करून मोठी गर्दी जमवली होती. त्यामुळे या कार्यक्रमाच्या आयोजकांनी नवी मुंबई पोलिसांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याने पनवेल तालुका पोलिसांनी आयोजक रमाकांत चैरमेकर, अंकित वर्मा व सहारा रिसॉर्टचे मालक व व्यवस्थापक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed