• Sat. Sep 21st, 2024
आई-वडिलांना मानसिक विकार, लेकराला आत्याचा लळा; मुलाच्या पालकत्वाबाबत कोर्टाचा मोठा निर्णय

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : आई-वडील मानसिक विकाराने ग्रस्त असल्याने लहान मुलाचे पालनपोषण नीट होणार नसल्याचे आणि त्या मुलाला आत्याचा लळा असल्याचे लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच त्याच्या हिताचा आदेश दिला. त्यानुसार, आत्याकडे त्याचे पालकत्व सोपवून त्याचा ताबा तिच्याकडे देण्याचा आदेश न्या. रियाझ छागला यांनी दिला. त्याचवेळी आई-वडिलांना अधूनमधून मुलाला भेटण्याची मुभा असेल, असेही न्या. छागला यांनी आदेशात स्पष्ट केले.

‘मुलाच्या जन्मानंतरच माझा भाऊ व वहिनीने त्याचा ताबा माझ्याकडे देण्याची तयारी दर्शवली होती. कारण दोघांना मनोविकाराचा त्रास आहे. म्हणूनच ज्या वाडिया रुग्णालयात मुलाचा जन्म झाला, त्या रुग्णालयानेही मुलाबाबत माझ्या नावे डिस्चार्ज कार्ड दिले. मी विधवा असून, मला मूलबाळ नाही. शिवाय माझी आर्थिक परिस्थितीही चांगली असल्याने त्या मुलाचा मी चांगला सांभाळ करू शकते आणि त्याच्या कल्याणाचा विचार करू शकते. त्यानुसार काही वर्षे मुलगा माझ्यासोबत राहिल्यानंतर त्याच्या वडिलांनी म्हणजे माझ्या भावाने सन २०२१ मध्ये माझ्याविरोधात मुलाच्या अपहरणाची आणि त्याला जबरदस्तीने डांबून ठेवल्याची तक्रार भोईवाडा पोलिसांत दिली. म्हणून मी मुलाचा ताबा त्यांच्याकडे दिला.

दीड तासाचा प्रवास २० मिनिटात शक्य, पण ठाणे-बोरिवली बोगदा सात वर्ष रखडला, कारण संताप आणणारं
पण तो सारखा आजारी पडतो आणि त्याची प्रकृती खालावली असल्याचा दावा करत आई-वडिलांनी त्याला पुन्हा माझ्याकडे दिले. पूर्वीही जेव्हा केव्हा मुलगा त्यांच्यासोबत राहत होता, तेव्हा तो आजारी पडायचा आणि त्याच्यावर वैद्यकीय उपचार करणे भाग पडत होते’, असे म्हणणे आत्याने याचिकेत मांडले होते. न्या. छागला यांनी या याचिकेवर सुनावणी घेताना लहान मुलाशीही संवाद साधला आणि त्यानंतर त्याला आत्याचाच लळा असल्याचा निष्कर्ष मांडला.

घटस्फोटिता म्हणून मृत्यू नकोय, आजींची इच्छा, ८९ वर्षांच्या आजोबांना कोर्टाने घटस्फोट नाकारला

आईकडून गोंधळ, वडील तापट

‘याचिकेवरील सुनावणीच्या वेळी मुलाच्या जैविक आईने बराच गोंधळ घातला आणि त्याचे वडीलही खूप तापट असल्याचे पहायला मिळाले. लहान मुलाची आत्याच व्यवस्थित काळजी घेत आहे आणि त्याला तिचाच खूप लळा असल्याचे स्पष्ट झाले. अशा परिस्थितीत स्वत:चा निर्णय घेऊ शकत नसलेल्या लहान मुलाचे कायदेशीर रक्षक या नात्याने व त्या अधिकार क्षेत्रात या न्यायालयाला निर्णय द्यावा लागेल. त्याअनुषंगाने मुलाचे कायदेशीर पालकत्व आत्याकडे राहील आणि आई-वडिलांना अधूनमधून भेटण्याची मुभा असेल, असे जाहीर करण्यात येत आहे’, असे न्यायमूर्तींनी आपल्या आदेशात स्पष्ट केले.

आईनं कष्टानं वाढवलं, कृतज्ञता म्हणून मुलानं जीवंतपणीच आईचा संगमरवरी पुतळा उभारला

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed