• Mon. Nov 25th, 2024
    शंका विचारल्याचा राग, शिक्षिकेने विद्यार्थ्यांना रॉडने बेदम मारलं, डोंबिवलीतील घटना

    डोंबिवली: वर्गात शिकवलेले समजत नसल्याने शिक्षकांना डाऊट विचारणाऱ्या विद्यार्थ्यांना चक्क रॉडने शिक्षिकेने मारहाण केल्याची घटना डोंबिवली पश्चिमेकडील जोंधळे शाळेत घडली. पाचवीच्या वर्गातील अ आणि ब तुकडीच्या विद्यार्थ्यांना या शिक्षिकेने मारहाण केली असून मानेवर पाठीवर हातावर पोटावर फटके बसल्याने हे विद्यार्थी वेदनेने विव्हळत आहेत.
    मध्यान्ह भोजनामुळे विद्यार्थ्यांना त्रास, खिचडी खाल्ल्यानंतर उलट्या, मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील घटना
    अनेक विद्यार्थ्यांच्या मनगटावर मार बसल्याने त्यांना हाताची हालचाल करता येत नसून काही विद्यार्थी पाठीच्या दुखण्याने बेजार झाले आहेत. आपल्या लाडक्या मुलांची अवस्था पाहून पालक संतापले आहे. आज या पालकांनी शाळेत येऊन शिक्षकांना जाब विचारला. मात्र मारहाण करणारी शिक्षिका शाळेत नसल्याने पालकांनी मुख्याध्यापकांसमोर गराडा घातला. नीलम परिमल असे या शिक्षिकेचे नाव आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका बालमनी मेनन यांनी पालकांची माफी मागितली असून घडलेली घटना वेदनादायी असल्याचे म्हटले आहे.

    जे अजितदादा अन् साखर कारखानदारांच्या मनात, तेच राज्याचं धोरण; राजू शेट्टींची शिंदे-फडणवीसांवर टीका

    तसेच संबंधित शिक्षिकेने मुलांना मारहाण केल्याचे संध्याकाळी आपल्या कानावर आल्यानंतर लगेच शाळा प्रशासनाने या शिक्षिकेला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्या म्हणाल्या की, मात्र ही शिक्षिका केवळ पाच दिवसांपूर्वी शाळेत रुजू झाली होती. तिचे कोणतेही कागदपत्र शाळेत नसल्याने अशा प्रकारे ज्या व्यक्तीची पूर्ण माहिती नाही अशा व्यक्तीला शाळेत हजर करूनच कसे घेतले असा जाब पालकांसह मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. घटनेची माहिती मिळतात विष्णुनगर पोलिसांनी शाळेत धाव घेत पालकांना या प्रकरणी संबंधित शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे.

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *