• Mon. Nov 25th, 2024

    कांजुर डेपो जमिनीचे सर्वेक्षण आता सल्लागाराकडे, मीठ आयुक्तांच्या सर्वेक्षणाच्या आक्षेपावर उपाय

    कांजुर डेपो जमिनीचे सर्वेक्षण आता सल्लागाराकडे, मीठ आयुक्तांच्या सर्वेक्षणाच्या आक्षेपावर उपाय

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मेट्रो ६ साठी कांजुर येथील जमिनीवर प्रस्तावित असलेल्या दुरुस्ती डेपोसाठीच्या जमीन सर्वेक्षणाचे काम आता सल्लागार कंत्राटदाराकडे येणार आहे. मीठ आयुक्तांचा सर्वेक्षणावर आक्षेप असताना, डेपोसाठीच्या सल्लागारानेच ते काम करावे, असे ‘एमएमआरडीए’ने ठरवले आहे.

    जोगेश्वरी येथील स्वामी समर्थनगर ते विक्रोळीदरम्यान मेट्रो ६ या उन्नत मेट्रोची उभारणी सुरू आहे. या मार्गिकेसाठीच्या गाड्यांचा दुरुस्ती डेपो कांजुर येथील १५ हेक्टर जमिनीवर प्रस्तावित आहे. हा भाग मिठागरांनी वेढलेला असून, त्यामुळेच त्या जमिनीवर केंद्र सरकारच्या मीठ आयुक्तांनी दावा केला आहे. त्या स्थितीत राज्य सरकारने एप्रिलमध्ये ही जमीन दुरुस्ती डेपोसाठी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) वर्ग केली. त्यानंतर ‘एमएमआरडीए’ने या जमिनीच्या सर्वेक्षणाची तयारी सुरू केली होती. परंतु, त्याचवेळी मीठ आयुक्तालयांतर्गत भांडूप येथील मीठ अधीक्षक कार्यालयाने जमिनीवर दावा सांगत सर्वेक्षण रोखले होते. या सर्व पार्श्वभूमीवर एमएमआरडीए आता हे सर्वेक्षण सल्लागारामारर्फत करण्याच्या तयारीत आहे.

    बापरे! लांब केस, ८ फुटांपेक्षा उंच अन् धष्टपुष्ट, रहस्यमयी मानव कॅमेऱ्यात कैद, VIDEO पाहून धक्का बसेल
    याबाबत विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या डेपो उभारणीसाठी ‘एमएमआरडीए’ने सल्लागार नेमणुकीची निविदा याआधीच काढली आहे. १६ ऑक्टोबर या निविदेची अखेरची तारीख आहे. त्यानुसार, प्राप्त निविदांच्या आधारे सल्लागार निवडला जाईल. त्या सल्लागारानेच आता सर्वेक्षणासाठी मीठ आयुक्तालयाशी समन्वय साधणे आवश्यक असेल. अन्य कामांसह हे कामदेखील त्या सल्लागारालाच करायचे आहे, असा निर्णय घेण्यात आला आहे.’

    मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोची ट्रायल यशस्वी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed