• Mon. Nov 25th, 2024
    उसाच्या दुसऱ्या हप्त्याचे ४०० रुपये द्या, यापुढील आंदोलन सविनय नसेल, राजू शेट्टींचा इशारा

    कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता ४०० रूपये द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून साखर कारखान्यातून बाहेर पडणारे साखर कारखान्याची ट्रक अडवले जात असून या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार व शेतकरी संधटनांची बैठक पार पडली. मात्र, ही बैठक निष्फळ झाली असून बैठकीकडे जिल्ह्यातील अनेक चेअरमनांनी पाठ फिरविल्याने साखर कारखानदार दुसरा हप्ता न देण्याच्या ठाम भुमिकेत असल्याचे दिसू लागले आहे. यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली असून यापुढील आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा दिला आहे.

    जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत राजू शेट्टी म्हणाले, कृषी मुल्य आयोगाने एफ आर पी मध्ये केलेली वाढ ही चुकीची असून यामुळे शेतक-यांचे नुकसान होत आहे. शेतक-यांची एक टक्का रिकव्हरी इथेनॅालसाठी घेतल्यानंतर ३०७ रूपये शेतक-यांना दिले जातात मात्र यामधून कारखान्यांना जादा पैसे मिळतात. वारवांर आंदोलने करून जर पैसे मिळत नसतील तर मोठा संघर्ष सुरू होईल. आतापर्यंत राज्यातील ८ साखर कारखान्यांनी एफ. आर.पी पेक्षा जादा दर दिलेले आहेत. जिल्ह्यातील साखर कारखाने सक्षम असून ऊस दर नियंत्रणाच्या मान्यतेची तांत्रिक अडचण सांगून दुसरा हप्ता देण्यास टाळाटाळ करत आहेत, असं राजू शेट्टी म्हणाले.
    एकाच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतासह तीन संघांना दिले धक्के, पाहा पॉइंट्स टेबलमध्ये काय घडलं…
    सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्ह्यातील साखर कारखान्यांची साखर अडवणूक केली जात आहे. यामुळे पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये दररोज बाचाबाची होवू लागलेले आहे. संघटना आक्रमक झाल्याने तोडफोड करू लागले आहेत. आर. एस. एफ च्या धोरणात केंद्र व राज्य सरकारने चुकीचा हिशोब सादर केलेले असून यामुळे शेतक-यांचे नुकसान होवू लागले आहेत.यावेळी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी १५ ऑक्टोबरपूर्वी हिशोब पूर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी सर्व कारखान्यांना दिला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रा. डॅा. जालंदर पाटील , सावकर मादनाईक , यांचेसह जिल्ह्यातील साखर कारखान्याचे चेअरमन , कार्यकारी संचालक , साखर सहसंचालक अशोक गाडे यांचेसह विविध संघटनांचे प्रतिनिधी ऊपस्थित होते.
    IND vs PAK सामन्यापूर्वी रोहित शर्माची चिंता अखेर मिटली, संघात झाली मॅचविनर खेळाडूची एंट्री …
    दरम्यान, या बैठकीस अनेक साखर कारखानदारानी आपली पाठ फिरवली यामुळे ही बैठक निष्फळ ठरली असून यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने इथून पुढचे आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. शिवाय या पुढच्या आंदोलन हे सविनय मार्गाने होईल याची खात्री नाही असेही म्हणाले आहेत. शिवाय जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत कारखाने सुरू होऊ देणार नाही, असेही राजू शेट्टी म्हणाले आहेत यामुळे येत्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्या बद्दल संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे..
    शुभमन गिलनंतर अजून एका भारतीय स्टारला डेंग्यूची बाधा, पाकिस्तानच्या सामन्याला मुकणार
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed