• Sat. Sep 21st, 2024
पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवर उद्या एक तासाचा विशेष ब्लॉक, कोणत्या मार्गिकेवरील वाहतूक बंद?

पुणे : आयटीएमएस प्रणालीच्या कामासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर गुरुवारी पुन्हा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर दुपारी १२ ते १ असा हा एक तासांचा हा ब्लॉक असणार आहे. अमृतांजन पुलाच्या अलीकडे अन पलीकडे म्हणजे किलोमीटर ४५/६००० व ४१/५०० किमीवर ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाणार असल्याने हा ब्लॉक घेतला जाणार आहे. गॅन्ट्री बसविताना मुंबई वाहिनीवरील सर्व प्रकारची वाहतूक उर्से टोल नाका येथे तसेच शोल्डर लेन वर पूर्णपणे थांबविण्यात येणार आहे. फक्त कार साठी लोणावळा एक्झीट वरून जुन्या महामार्गावरून अंडा पॉईंट – मॅजिक पॉईंट वरून खोपोली शहरातून वळविण्यात येणार आहे,अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

काल देखील ग्रँटी टाकण्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. दोन तासांसाठी घेण्यात आलेला ब्लॉक हा अर्ध्या तासात संपला. त्यामुळे हा ब्लॉक घेताना प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर दरडी हटविण्यासाठी ब्लॉक घेण्यात आला होता. अनेकदा हा ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र तब्बल महिना ते दीड महिन्यांच्या कालावधीनंतर उद्या (गुरुवारी) पुन्हा १२ ते १ असा विशेष ब्लॉक मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर घेण्यात येणार आहे. त्यात मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशी नागरिकांनी यांची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
IND vs AFG Live Update: १२व्या षटकात भारताच्या १०० धावा, रोहित शतकाच्या जवळ पोहोचला
द्रुतगती मार्ग हा मुंबई – पुणेला जोडणारा महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावरून लाखोच्या संख्येने अनेक नागरिक प्रवास करतात. मुंबई ते पुणे दररोज अनेक नागरिक प्रवास या मार्गावरून करतात. या रस्त्यावरून दिवसभरात लाखो वाहने ये – जा करत असतात. उद्या एक तासाचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून प्रवाशी नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
रोहित शर्माने सचिनला मागे टाकत रचला वर्ल्ड कपमध्ये इतिहास, कोणालाही ही गोष्ट जमली नाही…
दरम्यान, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून प्रवाशांनी या विशेष ब्लॉकची माहिती घेऊन प्रवासाचं नियोजन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Maratha Reservation: न्या. शिंदे समिती विरोधातील याचिका फेटाळली,समिती संवैधानिकच, नागपूर खंडपीठाचा निर्वाळा

दादा भुसेंचे कॉल रेकॉर्ड चेक करा, ललित पाटील प्रकरणात सुषमा अंधारेंचा दादा भुसेंवर गंभीर आरोप

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed