नवी मुंबईमध्ये देखील पहिल्यांदाच गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम कामोठे येथे पार पडला कामोठे येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची अफाट गर्दी पाहायला मिळाली. यावेळी तरुणांची तुफान गर्दी आणि गौतमी पाटीलचा डान्स पाहताच तरुणांमधील खुर्च्या धरून नाचणे किंवा स्टेजवर जाण्याची हिंमत करणारे तरुण पाहायला मिळाले. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांमध्ये तरुणांचा जोश पाहून पोलिसांनाही तरुणांना आवरणे कठीण झाले. त्यामुळे अनेक पोलिसांनी या तरुणांवर लाठीचा धाक दाखवलेलाही पाहायला मिळालं. धक्कादायक बाब म्हणजे, यावेळी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात साप निघाल्याचंही उघडकीस आलं आहे. चालू कार्यक्रमात जेव्हा साप निघाला त्यावेळी एकच खळबळ उडाली होती.
नवी मुंबईतील कामोठे परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटक सचिव राजकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नवी मुंबईतल्या कामोठे भागात हा कार्यक्रम गौतमी पाटीलचा पहिलाच कार्यक्रम होता. त्यामुळे गौतमीला पाहण्यासाठी तरुणांसह इतरही प्रेक्षकांची तुफान गर्दी झालेली होती. खुर्च्यांची मोडतोडही सुरु झाली. त्यानंतर गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचा धाक दाखवला तसंच कारवाई करत हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना बाहेरही काढलं. मात्र, तोपर्यंत काही उत्साही तरुणांनी खुर्च्यांची तोडफोडही केली. कामोठे भागात गौतमी पाटील पहिल्यांदाच आली होती. तरीही तिच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाल्याचं पाहण्यास मिळालं.
“सबसे कातील गौतमी पाटील”, अशी ओळख असणाऱ्या गौतमी पाटीलच्या नवी मुंबईतल्या कार्यक्रमात राडा झाला आहे. तरुणांनी गौतमीला बघण्यासाठी गर्दी केली होती. या कार्यक्रमात खुर्च्यांची तोडफोड आणि राडा झाला आहे. ज्यानंतर पोलिसांना गर्दीला पांगवण्यासाठी कारवाई करावी लागली आहे. गौतमी पाटीलने अनेकदा हे सांगितलं आहे की “माझ्या कार्यक्रमात राडा करायचा असेल तर येऊच नका”. मात्र, गौतमीचा कार्यक्रम म्हटलं की त्यात राडा होणारच हे जणू काही समीकरणच झालं आहे. त्यामुळेच गौतमीला गणपती उत्सवात कोल्हापूरमधल्या दोन ठिकाणी कार्यक्रम करण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. नवी मुंबईत गौतमी पाटीलचा हा पहिलाच कार्यक्रम होता, ज्यात राडा झाला आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News