• Tue. Nov 26th, 2024
    Pune Gas leakage: पुण्यात स्विमिंग पूलमध्ये क्लोरीन गॅसगळती, २२ जणांना श्वास घेण्यास त्रास

    पुणे, पिंपरी-चिंचवड : पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील कासारवाडी परिसरात असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जलतरण तलावात आज सकाळी २० ते २२ जण पोहण्यासाठी आले होते. त्याचबरोबर या ठिकाणी देखभाल करणारे आणि सुरक्षारक्षक देखील होते. तलावात पोहताना मात्र अचानक अनेक जणांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला तसेच परिसरात क्लोरिन गॅस पसरल्याने काही मीटरपर्यंत नागरिकांना खोकला, गळ्याचा त्रास आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर जलतरण तलावातील काहीजण बेशुद्ध पडू लागले.

    या घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी कासारवाडी येथील स्विमिंग पूलाच्या समोरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर बेशुद्ध पडलेल्या आणि श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या महापालिका सुरक्षारक्षक, जीवरक्षक यांच्यासह पोहण्यास आलेल्या नागरिकांना वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी वायसीएम रुग्णालयात जाऊन उपचारार्थी भेट घेऊन माहिती जाणून घेतली. या घटनेतील एका लहान मुलीला आयसीयूत दाखल करण्यात आले आहे.

    NCP Crisis: शरद पवार गटाकडे झुकलेल्या कलानींना वळवणार? परांजपेंची सेटिंग, ओमी कलानी अजितदादांच्या भेटीला
    या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा हलगर्जीपणा समोर आलेला आहे. या घटनेप्रकरणी महानगरपालिका कोणावर कारवाई करणार का? हे पाहणं महत्वाचं आहे. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड परिसरात एकच खळबळ उडली होती. त्यामुळे महापालिकेचा हलगर्जीपणा समोर आला असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. या घटनेनं आम्ही आमच्या मुलांना पोहायला पाठवायचे की नाही? असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. या घटनेनंतर पालक वर्ग घाबरलेल्या अवस्थेत आहे.

    बापरे! मिचेल सँटनरने एका चेंडूत केल्या १३ धावा, शेवटच्या षटकात नेमकं घडलं तरी काय? VIDEO

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed