• Sat. Sep 21st, 2024

आईने चप्पल ओळखली अन् तो अडकला पोलिसांच्या जाळ्यात, भयंकर घटनेचा फिल्मी स्टाइल उलगडा

आईने चप्पल ओळखली अन् तो अडकला पोलिसांच्या जाळ्यात, भयंकर घटनेचा फिल्मी स्टाइल उलगडा

कल्याण: कल्याण-डोंबिवली परिसरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता तर नागरिकांना घरात राहणेही मुश्किल झालेलं आहे. कारण, गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे. कल्याण खडकपाडा परिसरात एका व्यक्तीने नऊ महिन्याआधी उत्तर प्रदेशमधील २० वर्षीय तरुणीशी लग्न केले. त्याने कल्याण पश्चिमेतील एका चाळीत आपला लग्नाचा सुखी संसार मांडला.

पीडितेचा पती हा एका बेकरीत काम करतो. बेकरीच्या कामासाठी तो कुठल्याही वेळी बेकरीत जातो. अशाचप्रकारे तो काल सायंकाळी घराच्या काही अंतरावर असलेल्या त्याच्या बेकरीत कामासाठी गेला. यावेळी त्याची पत्नी ही घरात एकटी असताना पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास घराच्या खिडकीतून एका अज्ञात इसमाने घरात प्रवेश केला. त्याने तिच्या गळ्यावर आणि तळहातावर चाकूने सपासप वार केले.

सिलिंडरच्या नऊ स्फोटाने पिंपरी-चिंचवड हादरले, गॅस चोरीचा काळाबाजार समोर, नागरिकांचा जीव धोक्यात
जखमी अवस्थेत पीडितेने आरडाओरडा सुरू केला. तिचा आवाज ऐकून परिसरात नागरिकांनी तिच्याजवळ धाव घेतली. यावेळी तिच्या नवऱ्याला माहिती देण्यात आली. तुझ्या पत्नीला कुणीतरी मारहाण करत असल्याची माहिती तिच्या पतीला स्थानिकांनी दिली. पती हा घरी पोहोचेपर्यंत हल्ला करणारा हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला.

घरात जखमी अवस्थेत पडलेल्या पत्नीला त्याने उचलून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पीडिता सध्या गंभीर अवस्थेत असल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तयार केली.

माहेरशी जोडणारा एकुलता एक धागाही तुटला, तीन बहिणींच्या भावाचं राहत्या घरात टोकाचं पाऊल
पंचनामादरम्यान पोलिसांना घराजवळ एक चप्पल आढळून आली. आजूबाजूला शोध घेतला असता एका महिलेने ही चप्पल तिच्या मुलाची असल्याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, आरोपी गंगाधर हा त्यावेळेस आपल्या दुचाकीने परिसरात आला होता. पण, पोलिसांना पाहताच त्याने तेथून पळ काढला. यासंबंधी माहिती एका नागरिकाने पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत ६ तासात त्याच्या मुसक्या आवळ्याला आहेत.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed