अधिक माहिती अशी की, शिवांश हा त्याच्या आजोबांसोबत घराच्या अंगणात खेळत होता. त्यावेळी घरासमोरील ऊसाच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घालून शिवांशची मान पकडून त्याला नेऊ लागला. लागलीच परिसरात आरडोओरडा झाला. त्यावेळी या ठिकाणी असलेल्या अविनाश गडगे या तरूणाने मोठ्या हिमतीने बिबट्याच्या मागे पळत जाऊन शिवांशला बिबट्याच्या जबड्यातून सोडवले. त्यावेळी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या शिवांशला घरच्यांनी तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे उपचारा दरम्यान शिवांशचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती समजताच ओतुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी व्हि. एम. काकडे, आळेफाटा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांनी घटनास्थळी भेट दिली.
९ महिन्यात पाचवा बळी
वनविभागाकडे उपलब्ध असलेल्या नोंदींनुसार जुन्नर वनविभागाच्या कार्यक्षेत्रात गेल्या ९ महिन्यात बिबट्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्यांची संख्या या घटनेने पाच झाली आहे. जानेवारी ते एप्रिल या सलग चार महिन्यात चार बळी गेले. तर शिवांशच्या रुपात पाचवा बळी गेला असून एकूण १० जण आतापर्यंत जखमी झाले आहेत.
दुचाकीस्वारावर हल्ला
चारच दिवसांपूर्वी आळेफाटा परिसरात आगरमळा येथील एका दुचाकीस्वारावर बिबट्याने हल्ला केला होता यामध्ये थोडक्यात तो वाचला आहे.
गस्तीपथकांची नियुक्ती
झालेली घटना दुर्देवी आहे.याबाबतीत सर्व काही मदत कुटुंबियांना केली जाईल.पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत.आडवस्तीवर राहणाऱ्या ग्रामस्थांनी शक्यतो सकाळी व संध्याकाळी घराबाहेर पडताना खबदरारी घ्यावी – अमोल सातपुते(उपवनसंरक्षक,जुन्नर वनविभाग)